कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:21 AM2021-02-05T08:21:35+5:302021-02-05T08:21:35+5:30

अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी रबी हंगाम चांगला बहरला. मोठ्या पावसामुळे जलस्त्रोत मोठ्या प्रमाणात वाढले. सर्वत्र विहिरी, नद्या, तुडुंब भरल्या आहेत. ...

Farmers suffer due to low pressure power supply | कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

Next

अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी रबी हंगाम चांगला बहरला. मोठ्या पावसामुळे जलस्त्रोत मोठ्या प्रमाणात वाढले. सर्वत्र विहिरी, नद्या, तुडुंब भरल्या आहेत. चार वर्षांनंतर अंबाजोगाई तालुक्यात मुबलक पाणीसाठा झाला. शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा, करडई यासोबतच उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. या पिकांना पाणी देण्याची वेळ आता आली आहे. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत आहे. एक आठवडा दिवसा, तर एक आठवडा रात्री अशी वीज वितरणची व्यवस्था महावितरणकडून होते. होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. यामुळे विद्युतपंप चालत नाहीत. तर अनेक विद्युत पंप निकामी होतात. मोटारी जळतात. स्टार्टर उडतात. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. तसेच डीपीमध्ये बिघाड झाल्यास तो लवकर दुरुस्त केला जात नाही. जळालेला ट्रान्सफॉर्मर लवकर दुरूस्त करून मिळत नाही. यामुळे शेतीला पाणी देणे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. महावितरणने यासंदर्भात ठोस उपाययोजना आखून उच्च दाबाने वीजपुरवठा सुरू करून वीज अखंडित द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.

Web Title: Farmers suffer due to low pressure power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.