महावितरण कार्यालय परिसरातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 05:30 PM2019-12-04T17:30:45+5:302019-12-04T17:32:53+5:30

वीज जोडणी बदलून देण्याची शेतकऱ्याची मागणी 

Farmer's suicide attempt in the area of the Mahavitaran Office | महावितरण कार्यालय परिसरातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

महावितरण कार्यालय परिसरातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

अंबाजोगाई  : तालुक्यातील अकोला येथील शेतकऱ्याची शेतपंपासाठीची वीज जोडणी दुसऱ्या फिडरवर बदलून देण्याची मागणी आहे. यात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्याने महावितरणच्या कार्यालयातच किटक नाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी शहर पोलिसात शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

अरुण रंगनाथ बरकते (५०) असे शेतकऱ्याचे नाव आहे. बरकते यांच्या शेतातील पंपासाठी कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. यामुळे पंपासाठी वेगळ्या फिडरवरून जोडणी देण्याची त्यांनी महावितरणकडे मागणी केली आहे. मात्र या दिरंगाई होत असल्याने बरकते यांनी महावितरण कार्यालय परिसरात किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शहर पोलिसांनी त्यांना तात्काळ स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून त्यांची प्रकृतीस्थिर आहे. त्यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास जमादार बाबासाहेब नागरगोजे करीत आहेत.

वीज पुरवठा योग्य प्रमाणात होतो 
प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता वीज पुरवठा योग्य दाबाने होतो. शेतकऱ्याच्या आरोपात तथ्थ नाही.
- सुनील मस्के, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण

Web Title: Farmer's suicide attempt in the area of the Mahavitaran Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.