शेतकऱ्यांनी सूर्यफुलाकडे फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:29+5:302021-07-10T04:23:29+5:30
.... पावसामुळे कापरी नदी वाहती शिरूर कासार : शहराच्या पूर्वेकडे तहसील कार्यालयाकडे जाताना लागत असलेली कापरी नदी कोरडीठाक होती; ...
....
पावसामुळे कापरी नदी वाहती
शिरूर कासार : शहराच्या पूर्वेकडे तहसील कार्यालयाकडे जाताना लागत असलेली कापरी नदी कोरडीठाक होती; मात्र गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे नदीचे नवे फिटले आहे. पावसाने शुक्रवारी नदी वाहती झाली होती. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
...
पावसाने कपाशीची मशागत बंद
शिरूर कासार : लागवड झालेल्या कापसाला बैल पाळीचे काम सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने कपाशीच्या मशागतीची कामे वापसामोड झाल्याने बंद झाली आहेत. ज्या कपाशीची मशागत झाली. त्या कपाशीला हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.
....
युरिया खताची कृत्रिम टंचाई
शिरूर कासार : पाऊस पडला की शेतकरी रासायनिक खते खरेदी करण्यासाठी दुकानात जात असतो. रात्री पाऊस झाल्याने पिकांसाठी युरिया खताला मागणी वाढली आहे. नेमक्या संधीचा फायदा घेत विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. चढ्याभावाने कोणी खत विक्री करीत असल्यास तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करावा. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांनी सांगितले.
....
पीक विम्याकडे फिरवली पाठ
शिरूर कासार : तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या संभाव्य नुकसानाबाबत सुरक्षित रहावे. नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकऱ्यांना आधार वाटावा म्हणून विम्याचे संरक्षित कवच म्हणून विमा भरणे हिताचे असते. यामुळे शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत पीक विमा भरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.
...