पावसामुळे शेतकरी झाले समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:03+5:302021-06-10T04:23:03+5:30
.... बियाणे खरेदीची लगबग अंबाजोगाई : मृग नक्षत्राला प्रारंभ झाल्याने बळीराजा आता पेरणीपूर्व मशागत आटोपून पेरणीच्या तयारीला लागला आहे. ...
....
बियाणे खरेदीची लगबग
अंबाजोगाई : मृग नक्षत्राला प्रारंभ झाल्याने बळीराजा आता पेरणीपूर्व मशागत आटोपून पेरणीच्या तयारीला लागला आहे. सध्या शेतकरी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी नवामोंढ्यात गर्दी करीत आहेत. शहरातील खते व बियाणे केंद्रावर बुधवारी शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली.
....
वेगवान वाहनांमुळे अपघातात वाढ
अंबाजोगाई : शहरात सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भरगर्दीच्या रस्त्यातूनही मोटारसायकल चालक युवक गाड्या वेगाने चालवितात. यामुळे अपघाताचा धोका आहे. अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
....
'पीककर्ज त्वरित वाटप करा'
अंबेजोगाई : कोरोनाच्या काळात सगळेच हवालदिल झाले आहेत. त्यात शेतकऱ्यांची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. आता पेरणीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज वाटप करावे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांना बियाणे मोफत पुरवावे. शासनाने नेमून दिलेल्या उद्दिष्टानुसार पीककर्ज त्वरित दिले गेले नाही, तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुका अध्यक्ष अच्युत गंगणे यांनी दिला आहे.
....
नद्यांचे प्रदूषण वाढले
अंबेजोगाई : तालुक्यात प्रामुख्याने जल, वायुप्रदूषणाची समस्या डोके वर काढत आहे. बहुतांश नद्यांमध्ये प्लास्टीक मोठ्या प्रमाणात साठले आहे. त्यामुळे ते रोखण्यासाठी शासन प्रशासन आणि जनसामान्य असा त्रिवेणी संगम होणे आज गरजेचे झाले आहे. नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
....
गतिरोधकाला पांढरे पट्टे न मारल्याने अपघात
अंबेजोगाई : शहरात भगवानबाबा चौक ते मेडिकल कॉलेज, शिवाजी चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या मुख्य रस्त्याचे काम होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला. तरीही अजूनही या रस्त्यावर असणाऱ्या गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्यात आले नाहीत. परिणामी, भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना अनेकदा गतिरोधकच दिसत नाही. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी बांधकाम विभागाने गतिरोधकांना पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी केली आहे.
.....