शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आॅफलाईन -क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:45 PM2019-08-12T23:45:33+5:302019-08-12T23:46:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभागाच्या वतीने फळे व भाजीपाला उत्पादन शेतक-यांची कार्यशाळा सोमवारी ...

Farmers will benefit from various schemes offline | शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आॅफलाईन -क्षीरसागर

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आॅफलाईन -क्षीरसागर

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची कार्यशाळा : फळ प्रक्रिया व फलोत्पादनास प्रोत्साहन व प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभागाच्या वतीने फळे व भाजीपाला उत्पादन शेतक-यांची कार्यशाळा सोमवारी झाली. यावेळी रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शेतकºयांना दिल्या जाणाºया योजनांचा लाभ आॅफलाईन पद्धतीने दिला जाणार असल्याची घोषणा केली. आॅफलाईनमुळे योजनेचा लाभ शेतक-यांना फायदा होणार आहे.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आ. भीमराव धोंडे, आ. आर. टी. देशमुख, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, मनरेगा आयुक्त ए.एस.आर.नायक, कृषी संचालक (फलोत्पादन) पी.एन. पोकळे, प्र.जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, रोहयो उपसचिव प्रमोद शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम व इतर मान्यवर उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले निसर्गाच्या ºहासामुळे समतोल बिघडला आहे. आपल्याकडे दुष्काळी परिस्थिती आहे तर कोल्हापूर, सांगली भागात पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतक-यांनी कमी पाण्यावर आधारीत पिकपद्धतीचा अवलंब केला पाहिजे. बालाघाटातील सिताफळ हे महत्वाचे उत्पादन असून यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प बीड व नांदेड या दोन जिल्हयात उभे करण्यात येतील. यासह काजू, आंबा आदी फळ प्रक्रिया व फलोत्पादनास प्रोत्साहन व प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. तसेच आपल्या जिल्हयातील शेतकºयाच्या विकासामध्ये या कार्यशाळेतील माहितीचा निश्चित उपयोग होईल. कमी पाणी वापरासाठी शेततळे, ठिबक सिंचन, अस्तरीकरण अशा वेगवेगळया योजनांच्या लाभासाठी शेतकरी बांधवानी पुढे यावे. मागेल त्याला शेततळे सारख्या योजनेमध्ये अर्ज करावेत. आॅनलाईन, आॅफलाईन अर्ज केलेले स्वीकारले जातील. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकºयांना लाभ होईल, असेही मंत्री क्षीरसागर यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील तसेच राज्यात रोजगार हमीच्या माध्यमातून शेत रस्ते, पाणंद रस्ते याची कामे केली जातात. जिल्हयात पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहीरी देखील देण्यात येतील. तसेच वैयक्तीक लाभाच्या १० हजार विहिरी मंजूर करुन जिल्हयातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल, अशी हमी त्यांनी दिली. तसेच बुडीत क्षेत्रात ३०० विहिरी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रोहयो मध्ये २८ नव्या कामांचा समावेश करण्यात येत आहे, त्याचा फायदा निश्चित होईल असे त्यांनी सांगितले. छोटे टॅक्टर असो अथवा शेतीचे यांत्रिकीकरण असो यासाठी देखील प्रोत्साहन पाठपुरावा करण्यात येईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी संचालक पी.एन.पोकळे यांनी केले यावेळी फलोत्पादन विभागाच्या कामकाजाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली तसेच जिल्हयातील फलोत्पादन विकासासाठी प्रामुख्याने कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे ते म्हणाले.
कीड प्रार्दर्भाव माहितीपर पुस्तिका व भिंतीपत्रकांचे प्रकाश्न
यावेळी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते गुलाबी बोंडअळी, कीड, हुमणी याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माहिती पुस्तिका व भिंतीपत्रकाचे प्रकाशन केले. याचबरोबर त्यांच्या हस्ते यावेळी राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्र.जिल्हाधिकारी प्रविण धरमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आदींनी स्वीकारला. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलमित्र पुरस्कार रोहयो उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी स्वीकारला. तसेच शेख मजिद यांना उत्कृष्ट काम करणाºया गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीचा पुरस्कार सरपंच सुरेश जाजू यांना प्रदान करण्यात आला.
ग्रामविकासाला रोहयोची जोड आवश्यक : पंकजा मुंडे
ग्रामविकास, कृषी विकासासाठी फलोत्पादन व रोहयो हा विषय महत्त्वाचा आहे. सुरवातीला हा विभाग, हे खाते माज्याकडे होते मधल्या काही काळानंतर ते आता जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून परत जिल्ह्यास मिळाले आहे. ग्रामविकासासाठी रोहयोची जोड असणे देखील महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच आम्ही शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
जिल्हयाच्या आणि राज्याच्या शेती विकासासाठी काहीही कमी पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी यावेळी दिली. तसेच रोहयोच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी दिली जाऊ शकते. यापूर्वी देखील मनरेगातून शेततळे, सिंचन विकास केला, १ लाख विहीरी घेतल्या गेल्या. आत्ताच्या परिस्थितीत या विभागाला पालकमंत्री पांदन रस्ता हा विशेष कार्यक्रम राबवता येईलअसेही पालकमंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Web Title: Farmers will benefit from various schemes offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.