शेतकऱ्यांच्या हाताला पीक लागणार नाही - सुनील केंद्रेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:09 AM2019-11-03T00:09:36+5:302019-11-03T00:10:50+5:30
शेतक-यांनी काळजी करु नये या परिस्थितीत नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल कंद्रेकर यांनी केले आहे.
बीड : पीक वाढीच्या वेळी पासाने उसंत दिल्यामुळे वाढ व्यवस्थित झाली नव्हती. आणि आता काढणीच्या वेळी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरासरी ९० ते ९५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला पिक लागणार नाही. परंतु शेतक-यांनी काळजी करु नये या परिस्थितीत नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल कंद्रेकर यांनी केले आहे.
शनिवारी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी गेवराई, माजलगाव, बीड तालुक्यातील गावांमध्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना केंद्रेकर म्हणाले, प्रत्येक गावांत जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. शेतकºयांनी अर्ज भरलेला असो किंवा नसो पंचनामा मात्र होणार आहे. शेतकºयांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. सर्व बाधित शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामा केला जाणार आहे. एकत्रितरित्या सर्व अर्ज स्विकारून त्यामुळे प्रत्येकाने तालुक्याला येऊन अर्ज देण्याची गरज नाही. विमा कंपनीकडून जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार लाभ दिला जाणार आहे. तसेच एनडीआरएफ मधून देखील मदत मिळवण्याचा प्रयत्न आहे. तसेच तीन दिवसांत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, येत्या १५ दिवसात शेतकºयांना मदत मिळण्याची आशा असल्याचे केंद्रेकर म्हणाले.