बोगस मुद्रा लोन प्रकरणी तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:12 AM2019-12-26T00:12:46+5:302019-12-26T00:13:35+5:30
सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा, स्वत:च छोटे मोठे दुकान टाकून व्यवसाय उभा करता यावा म्हणून मुद्रा योजना देशभर उपलब्ध करून दिली.
गेवराई : सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा, स्वत:च छोटे मोठे दुकान टाकून व्यवसाय उभा करता यावा म्हणून मुद्रा योजना देशभर उपलब्ध करून दिली. मात्र ही योजना तलवाडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कागदी घोडे नाचवून गरीब सुशिक्षित बेरोजगार युवकांना डावलत श्रीमंत लोकांना कोट्यवधींचे कर्ज दिल्याचा आरोप या युवकांनी केला आहे. त्यामुळे तत्कालीन शाखाधिकारी डोंगरे, चव्हाण, मुळे यांनी अन्याय केला आहे. तरी यांच्यावर तत्काळ करण्यात यावी, तरुण उपोषणास बसले आहेत.
यामध्ये सुमेध करडे, धम्मानंद भोले, सचिन पटेकर हे तीन दिवसांपासून बँकेसमोर उपोषणाला बसले आहेत. तीन दिवस उलटूनही बँक विभागीय व्यवस्थापकांनी व बँक प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गावकºयांतून होत आहे. तलवाडा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे मागील तीन वर्षात २ कोटी २० लाख ६८ हजार रु पये एवढी मोठी रक्कम वाटप करण्यात आली. मात्र नियमाची पायमल्ली करत या प्रकरणाशी संबंधित शाखाधिकाºयांनी बोगस लाभार्थ्यांची कसल्याही प्रकारची खातरजमा न करता बँकेच्या दलालामार्फत रक्कम वाटप करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचे बोगस दुकाने दाखवून शासनाला चुना लावला आहे. तरी या गैरव्यवहाराची चोकशी करून डोंगरे, मुळे, चव्हाण यांच्यावर तत्काळ कारवाई करून निलंबित करण्यात यावे, या मागणी साठी सुमेध करडे व सहकाºयांनी ११ सप्टेंबर १९ रोजी उपोषण केले. मात्र त्यांना कारवाई करू असे पत्र देण्यात आले होते.
तद्नंतर तीन महिने होऊन सुद्धा या तिघांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा ही मागणी घेऊन सुमेध करडे, धम्मानंद भोले, सचिन पटेकर २३ डिसेंबर १९ पासून बँकेसमोर उपोषणाला बसले आहेत. तीन दिवस होऊन सुद्धा बँकेकडून दखल घेतली जात नसल्याने सचिन पटेकर यांची तब्येत खालावली आहे. त्यांना चकरा येऊ लागल्या आहेत. जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून डोंगरे, मुळे, चव्हाण या शाखाधिकाºयांच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत व त्याचे निलंबन करण्यात यावे व न्याय देण्यात यावा अशी मागणी गावकºयांतून होत आहे.