बीड जिल्ह्यातील आष्टी येथे पारधी समाजाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:36 AM2018-10-16T00:36:15+5:302018-10-16T00:36:55+5:30
शासनाकडून घरकुल मंजुर झाले. परंतु बांधण्यासाठी जागा नसल्याने सरकारी गायरानातील जमीन मिळावी, या मागणीसाठी आष्टी तहसीलसमोर तालुक्यातील सराटेवडगाव येथील पारधी समाजबांधवांनी मुलाबाळांसह सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : शासनाकडून घरकुल मंजुर झाले. परंतु बांधण्यासाठी जागा नसल्याने सरकारी गायरानातील जमीन मिळावी, या मागणीसाठी आष्टी तहसीलसमोर तालुक्यातील सराटेवडगाव येथील पारधी समाजबांधवांनी मुलाबाळांसह सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
सराटेवडगाव येथे ५० वर्षांपासून राहत आहेत त्यांना शासनाने घरकुल ही मंजुर केले. परंतु हे घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी सराटेवडगाव येथील गायरान हद्दीत जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी पारधी समाजातील सागक्षा भोसले, पिंय्या भोसले, भावज्या भोसले, दुलदुलडया भोसले, पंडया भोसले, लालेश भोसले, शामदया भोसले, कल्याण भोसले, राणी भोसले, नागू भोसले, सपना भोसले, कल्याण भोसले आदींच्या या निवेदनांवर सहया आहेत. जमिनीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने उपोषण करावे लागत असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.