पीकविम्यासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:27 PM2018-09-27T23:27:08+5:302018-09-27T23:28:30+5:30
पीक विम्याची रक्कम तत्काळ द्यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा बॅँकेसमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पीक विम्याची रक्कम तत्काळ द्यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा बॅँकेसमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे.
माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील शेतकºयांनी सेवा सहकारी सोसायटी छत्रबोरगावमार्फत जिल्हा बँक शाखा गंगामसला येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये कपाशीचा विमा भरला होता. मात्र पीक विमा अजूनही शेतकºयांना मिळालेला नाही. सध्या पाऊस नसल्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आहे. सध्या शेतकºयांचे विम्याचे पैसे आलेले असताना ते त्यांना मिळत नाहीत.
तोंडी चर्चा करून हा प्रश्न सुटत नसल्याने गुरुवारी बोरगाव येथील शेतकºयांनी उपोषण सुरू केले आहे. दिवसभर या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे आंदोलक शेतकºयांनी सांगितले. ज्ञानेश्वर जाधव, दत्तात्रय जाधव, सुशील जाधव, रावसाहेब बेद्रे,
सतीश जाधव, श्रीराम शेवाळे, दीपक जाधव, शिवाजी जाधव, उत्तमराव जाधव, हरिभाऊ जाधव, बालासाहेब जाधव, भागवतराव जाधव, दत्तात्रय बेद्रे, प्रकाश बेद्रे, बबन वळसे, गणेश कुदळे, अंकुशराव जाधव, लक्ष्मीकांत बंगाळ, दत्तात्रय जाधव, संतोष सायबर, रामभाऊ जाधव, अर्जुन लेंगुळे, संतोष सायबर, गणेश जाधव, सुदाम विभुते, विष्णू लेंगुळे, विठ्ठल जाधव, अर्जुन बेद्रे आदी उपोषणास बसले आहेत.