बौद्धविहाराच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:24+5:302021-08-14T04:39:24+5:30
उजनी येथे बौद्ध समाजाचे जवळपास ३०० लोक वास्तव्यास आहेत. या गावात अनेक वर्षांपासून बौद्धविहाराची वास्तू आहे. ...
उजनी येथे बौद्ध समाजाचे जवळपास ३०० लोक वास्तव्यास आहेत. या गावात अनेक वर्षांपासून बौद्धविहाराची वास्तू आहे. तिथे प्रार्थना, धार्मिक व सामाजिक उपक्रम होतात. बुद्धविहाराची जवळपास पूर्व-पश्चिम २०० मीटर, दक्षिणेस रावसाहेब यांची जमीन, उत्तरेस धसवाडीला जाणारा रस्ता अशा क्षेत्रफळाच्या परिसराचा ‘बुद्धविहार परिसर’ म्हणून सर्व बौद्ध समाज गेल्या अनेक वर्षांपूर्वीपासून वापर करीत आहे. या क्षेत्रफळात काही लोकांनी दांडगाईने, बळाचा वापर करून अवैधरीत्या अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटविण्यासंबंधी उजनी ग्रामपंचायतीकडे दोन वर्षांपूर्वीपासून तोंडी व लेखी पाठपुरावा केला; परंतु ग्रामपंचायतीने कसलीही कार्यवाही केली नाही; त्यामुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. तरीही दखल न घेतल्याने ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. या बेमुदत उपोषणात शिलावर मस्के, राजाबाई गायकवाड, नीताबाई गायकवाड, शीतल मस्के, आबई मस्के, अनिता गायकवाड, रुक्मिण मस्के, शशिकला मस्के, नीलावती मस्के, आशा घनघाव, लिंबाबाई मस्के, बाबूराव मस्के, मनुहर मस्के, अंगद गायकवाड, राजाभाऊ गायकवाड, संदीपान गायकवाड, ईश्वर मस्के, कल्याण गायकवाड, नागू मस्के, रमेश मस्के, प्रीतम मस्के यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
130821\img-20210813-wa0089.jpg
अंबाजोगाई येथे सुरू असलेले उपोषण