कार्यमुक्त कोविड कर्मचाऱ्यांचे कायम करण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:41+5:302021-02-16T04:34:41+5:30

बेरोजगारीमुळे आमच्यावर तसेच आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत आष्टी तालुक्यातील कार्यमुक्त कंत्राटी कोविड -१९ कर्मचाऱ्यांचे ...

Fasting to retain idle covid employees | कार्यमुक्त कोविड कर्मचाऱ्यांचे कायम करण्यासाठी उपोषण

कार्यमुक्त कोविड कर्मचाऱ्यांचे कायम करण्यासाठी उपोषण

Next

बेरोजगारीमुळे आमच्यावर तसेच आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत आष्टी तालुक्यातील कार्यमुक्त कंत्राटी कोविड -१९ कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी किंवा एनआरएचएमद्वारे तालुक्यातील आरोग्य विभागात असलेल्या रिक्त पदांवर समायोजन व्हावे व तशा प्रकारचे लेखी स्वरूपात आदेश मिळावे यासाठी १५ फेब्रुवारी रोजी आष्टी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी रिझवान अधोनी, स्वाती मानमोडे, अन्सार पठाण, सुजाता सायकड, अश्विनी शेळके, रुपाली काळे, ज्योती जगताप, फैसल शेख, रवि माने, अमोल रसायली, संतोष वाघमारे, प्रेमचंद गायकवाड, अश्विनी पानतावणे, नवनाथ बर्फे, अरर्श अधोनी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. या उपोषणास मनसेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, संपत सायकड यांनी पाठिंबा दर्शवत या मागण्या मान्य न झाल्यास मनसे आंदोलन छेडेल, असा इशारा दिला आहे.

Web Title: Fasting to retain idle covid employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.