रस्त्यासाठी शेतक ऱ्यांचे बांधावर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:06 AM2018-10-26T00:06:43+5:302018-10-26T00:07:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : कोळगाव अंतर्गत येणाºया एका वस्तीवर तसेच शेतात जाण्यासाठी असलेला बैलगाडी रस्ता हा एका शेतकºयाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : कोळगाव अंतर्गत येणाºया एका वस्तीवर तसेच शेतात जाण्यासाठी असलेला बैलगाडी रस्ता हा एका शेतकºयाने अडविल्याने हा रस्ता तात्काळ रहदारीसाठी खुला करावा या मागणीसाठी परिसरातील शेतकºयांनी गुरुवारी शेतातील बांधावरच उपोषण सुरु केले होते. दरम्यान नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी मोजणीनंतर हा रस्ता खुला करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. मौजे कोळगाव अंतर्गत येणाºया महानोरवाडी, भिल्लवस्ती ते बंगाली-पिंपळा रस्त्याला जोडला गेलेला सर्वे नंबर बांधावरुन बैलगाडी रस्ता आहे. या रस्त्यावरुन मोठी रहदारी असते. मात्र हा रस्ता जाणीवपूर्वक खोडा घालण्याच्या दृष्टीने आसाराम कांबळे व सुभाष आसाराम कांबळे यांनी अडविल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. परिणामी शेतकरी व वस्तीवर राहणाºया नागरिकांना रहदारीस पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे, दळणवळणाची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत रितसर मोजणी फिस भरुन देखील कांबळे यांनी मोजणी होऊ दिली नव्हती. यामुळे संतापलेल्या शेतकरी, नागरीकांनी तात्काळ रस्ता खुला करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच तहसील प्रशासनाला निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्याने गुरुवारी महानोरवाडी-बंगाली-पिंपळा रस्त्यावरील गट नंबर ६६७ या बांधावरच आमरण उपोषण सुरु केले.
दरम्यान नायब तहसीलदार अशोक भंडारी, मंडळ अधिकारी साळुंके, सुतार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिस बंदोबस्तात भूमिअभिलेख कार्यालयाकडून रस्ता मोजणी करुन रितसर वाहतुकीस खुला केला जाईल असे आश्वासन दिले. या आंदोलनात बळीराम धोंगडे, महादेव लकडे, बबन मदने, हरि धोंगडे, संभाजी शिंदे, विष्णु लकडे, बप्पासाहेब मदने आदीसह परिसरातील पुरुष- महिलांनी सहभाग घेतला होता.