जमीन वाटणीस नकार देणाऱ्या पित्यास मुलाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:13+5:302021-01-25T04:34:13+5:30
केज : अर्धी जमीन का वाटून देत नाही, या कारणावरून मुलाने स्वतःच्या पित्याला चुलत्याची मदत घेत गजाने व ...
केज : अर्धी जमीन का वाटून देत नाही, या कारणावरून मुलाने स्वतःच्या पित्याला चुलत्याची मदत घेत गजाने व बेल्टने मारल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी केज पोलिसात मुलासह भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील ढाकणवाडी येथील रामेश्वर हंगे यांना दोन मुले आहेत. २३ जानेवारी रोजी सकाळी त्यांचा मुलगा किशोर व त्यांचा भाऊ नवनाथ हंगे हे दोघे चुलते-पुतणे घरी आले. किशोर याने वडील रामेश्वर हंगे यांच्या नावावर असलेल्या जमिनीपैकी निम्मी जमीन माझ्या नावावर का करत नाहीत म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. वडिलांनी किशोरच्या नावे जमीन करण्यास नकार देताच त्यांना कमरेच्या बेल्टने मारहाण करण्यात आली. यावेळी नवनाथ हंगे यानेदेखील लोखंडी गज डोक्यात मारून रामेश्वर हंगे यांचे डोके फोडले. या प्रकरणी रामेश्वर हंगे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात मुलगा किशोर हंगे आणि भाऊ नवनाथ हंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.