केजमध्ये पित्याचा मुलावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:23+5:302021-07-14T04:38:23+5:30

------ परळीत किराणा दुकानात गुटखा पकडला बीड : परळी शहरातील तेलघाना परिसरातील एका किराणा दुकानात कारवाई करू पोलिसांनी विविध ...

Father stabs son in cage | केजमध्ये पित्याचा मुलावर चाकूहल्ला

केजमध्ये पित्याचा मुलावर चाकूहल्ला

Next

------

परळीत किराणा दुकानात गुटखा पकडला

बीड : परळी शहरातील तेलघाना परिसरातील एका किराणा दुकानात कारवाई करू पोलिसांनी विविध कंपन्यांचा पान मसाला, जर्दा, गुटखा असा १३ हजार ११६ रुपयांचा माल जप्त केला. पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या फिर्यादीवरून सुरेश वाल्मीक सिरसाट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक जिरगे करीत आहेत.

------------

माजलगावात बँकेसमोरून दुचाकी चोरली

बीड : माजलगाव येथील पूर्णवादी बँकेसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. १ जुलै रोजी ही घटना घडली. नारायण मारुती शिंदे यांनी शोधाशोध करूनही दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे १२ जुलै रोजी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोना मुळे करीत आहेत.

----------

दुचाकीच्या धडकेत एक ठार, गुन्हा दाखल

बीड : भरधाव दुचाकीने धडक दिल्याने शंकर देवसिंग राठोड हे खाली पडल्याने व डोक्यात तसेच बरगडीला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ८ जुलै रोजी माजलगाव ते गढी रोडवर जायकवाडी फाट्याजवळ ही घटना घडली होती. याप्रकरणी मयताचा भाचा संजय अभिमान चव्हाण याच्या फिर्यादीवरून दुचाकीच्या (क्र. एम.एच. २३ के ८०४०) चालकाविरुद्ध माजलगाव ग्रामीण ठाण्यात १२ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Father stabs son in cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.