दिवसा दुचाकी चोरी, तर रात्री घरफोडीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:42+5:302021-02-23T04:50:42+5:30

माजलगाव : शहरात मागील सहा महिन्यांपासून रहदारीच्या ठिकाणी दररोज भरदिवसा रोज किमान एका दुचाकीची चोरी, तर रात्री घरफोडीचे ...

Fear of burglary during the day and burglary at night | दिवसा दुचाकी चोरी, तर रात्री घरफोडीची भीती

दिवसा दुचाकी चोरी, तर रात्री घरफोडीची भीती

Next

माजलगाव : शहरात मागील सहा महिन्यांपासून रहदारीच्या ठिकाणी दररोज भरदिवसा रोज किमान एका दुचाकीची चोरी, तर रात्री घरफोडीचे गुन्हे होत आहेत. येथील पोलीस यंत्रणा ढेपाळली असल्याने गुन्हेगारांवर त्यांचा वचक राहिला नसल्याने दररोज अशा घटना घडत असून, शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान नवीन बसस्थानकासमोरून सुधीर नागापुरे यांची दुचाकी केवळ दोन मिनिटात लंपास करण्यात आली. मागील पाच दिवसात दररोज एक दुचाकी चोरीस जात असताना पोलीस तपास शून्य असल्याने जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे. माजलगाव शहरात मागील सहा महिन्यांपासून नवीन बसस्थानक, लोकनेते महाविद्यालय परिसर, संभाजी चौक, विवेकानंदनगर, विविध बँका, नागरी वसाहती आदी ठिकाणी दररोज एक दुचाकी चोरी होण्याची घटना सातत्याने घडत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये रात्रीच्या चोऱ्या सातत्याने सुरूच आहेत. एक - दोन गुन्ह्यांचा तपास लावत गुन्हेगार पकडल्याचा आव आणून पोलीस आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार होत आहे. मात्र, जनतेच्या मनातील भीती दूर करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पाच मिनिटात दुचाकी गायब होत असल्याने सराईत गुन्हेगारांची टोळी येथे कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता दुचाकी कोठे न्यायची? दुचाकी सांभाळण्यासाठी एका व्यक्तिला ठेवावे लागते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे विविध भागात रहिवाशांनी गस्त सुरू केली आहे. ज्यांच्या दुचाकी चोरी गेल्या त्या पुन्हा मिळतच नाहीत. त्यामुळे बरेच नागरिक तक्रार देण्यास तयार होत नाहीत. म्हणूनच चोरट्यांचे फावत असून, त्यांना पोलीस यंत्रणेचा कुठलाही धाक न राहिल्याचे दिसत नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने अशा चोरट्यांचा तपास लावावा, अशी मागणी होत आहे.

विविध अँगलने तपास

पोलिसांकडून चोऱ्यांचा विविध अँगलने तपास केला जात आहेत. तपास लवकरच लागेल. शहरात व्यापाऱ्यांनी दुकानात सीसीटीव्ही बसवले असून, ते केवळ दुकानातच दिसतात. त्यांनी सीसीटीव्हीचा एखादा कॅमेरा बाहेर रस्त्याच्या दिशेने वळवलेले असते तर चोऱ्यांचा तपास लागण्यास मदत झाली असती.

- सुरेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव.

Web Title: Fear of burglary during the day and burglary at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.