विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:07+5:302021-01-02T04:27:07+5:30
घरकुल लाभार्थींच्या अनुदानात वाढ करा अंबाजोगाई : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना घरकुल देण्यात येते. महागाईच्या काळात ...
घरकुल लाभार्थींच्या अनुदानात वाढ करा
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना घरकुल देण्यात येते. महागाईच्या काळात घरकुल बांधण्यासाठी देण्यात येणारे अनुदान कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनुदान वाढवून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास जगताप यांनी केली आहे. वाळू, सिमेंट व इतर वस्तूंचे भाव वाढल्याने शासनाने निर्धारित केलेल्या रकमेमध्ये घरकुल बांधणे मोठ्या जिकिरीचे काम आहे.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सामान्य ग्राहक बँकेतील अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
मुख्य चौकांमध्ये
गतिरोधकाची गरज
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून केली जात आहे; परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे वाहनांच्या गतीला आवर घालणे कठीण झाले आहे.