ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:28+5:302021-05-09T04:34:28+5:30

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात बहुतांश गावांना ...

Fear of corona in rural areas | ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती

ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती

Next

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात बहुतांश गावांना कोरोनाने ग्रासले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा रुग्ण निष्पन्न करताना आरोग्य यंत्रणेसमोरही मोठ्या अडचणी निर्माण होतात. शहरी भागातील नागरिक ज्याप्रमाणे दक्षता बाळगतात, ती दक्षता ग्रामीण भागात दिसत नाही. परिणामी, कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे.

वृक्ष संवर्धनाची गरज

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात पठाण मांडवा परिसरात असलेल्या वनविभागाच्या जंगलात अचानक आग लागली. या आगीत अनेक वृक्षसंपदा जळून खाक झाल्या. डोंगरावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे वृक्ष होते. यात सीताफळांच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अचानक लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात वृक्ष्यांची हानी झाली. आता आगामी काळात या परिसरात वृक्षसंवर्धन करणे हे वनविभागासमोर मोठे आव्हान आहे. या कामी सामाजिक संस्थांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी वृक्षमित्र हेमंत धानोरकर यांनी केली आहे.

संरक्षक भिंती झाल्या विद्रूप

अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरात असणाऱ्या विविध शासकीय कार्यालये, विविध संस्था, शाळा यांच्या संरक्षक भिंतीवर विविध क्लासेस, तसेच विविध कंपन्यांच्या वतीने संरक्षक भिंती रंगवून त्यांचा वापर जाहिरातबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अशा प्रकारच्या जाहिराती करण्यास निर्बंध घालणे गरजेचे झाले आहे. चांगल्या भिंतीचे विद्रुपीकरण करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा

अंबेजोगाई : गेल्या काही महिन्यांत अंबेजोगाई तालुक्यात व शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनचालक आपले वाहन चालवितांना वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत, तसेच अनेक युवक शहरातही गर्दीच्या ठिकाणी सुसाट वेगाने वाहन चालवितात. परिणामी, अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शासनाने हेल्मेटचा वापर सक्तीचा करूनही अनेक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामुळे अपघात झाल्यास मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो. यासाठी हेल्मेटला प्राधान्य द्या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवि मठपती यांनी केले आहे.

काकडीला मागणी वाढली

अंबेजोगाई : उन्हाळ्यात आहारामध्ये काकडीला महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. शरीराला थंडावा मिळत असल्याने, काकडीचा वापर करण्याकडे गृहिणींचा मोठा कल असतो. सध्या बाजारात काकडीची आवकही मोठ्या प्रमाणात असल्याने काकडी वीस ते पंचवीस रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. शहरवासीयांमध्ये काकडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Fear of corona in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.