रानडुकरांची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:30 AM2021-02-05T08:30:02+5:302021-02-05T08:30:02+5:30
प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. यावर्षी झालेल्या वादळी पावसाने प्रवासी निवाऱ्याची ...
प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. यावर्षी झालेल्या वादळी पावसाने प्रवासी निवाऱ्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने, तर अनेक ठिकाणचे बसण्यासाठीचे ओटे तुटल्याने प्रवासी जनतेसाठी ते निकामी ठरले आहेत. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये छत गळू लागल्याने या निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. हे प्रवासी निवारे दुरुस्त करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. गणेश मुडेगावकर यांनी केली आहे.
चोऱ्यांमध्ये होतेय वाढ
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थ रात्रभर जागून पहारा देत आहेत. या भागात गस्तीची मागणी होत आहे.