पत्नीचा खून करून भासवली आत्महत्या; सासऱ्यास दवाखान्यात बोलावले अन् भांड फुटले

By सोमनाथ खताळ | Published: April 7, 2023 05:36 PM2023-04-07T17:36:17+5:302023-04-07T17:46:49+5:30

'तुम्हारी बेटीने फांसी ली, सरकारी दवाखाने में जल्दी आओ'; पतीचा सासऱ्याला कॉल

Feigned suicide by killing his wife; The father-in-law was called to the hospital and a police exposed murder | पत्नीचा खून करून भासवली आत्महत्या; सासऱ्यास दवाखान्यात बोलावले अन् भांड फुटले

पत्नीचा खून करून भासवली आत्महत्या; सासऱ्यास दवाखान्यात बोलावले अन् भांड फुटले

googlenewsNext

बीड : शहरातील पेठबीड भागातील एक विवाहितेने आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या पतीने केला. परंतू विवाहितेच्या अंगावरील जखमा, वैद्यकीय अहवाल आणि गळ्यावरील खूना पाहता तिने आत्महत्या केली नसून तिचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. यावरून पेठबीड पाेलिस ठाण्यात आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पत्नीला मारून जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर पतीने आपला सासऱ्याला कॉल करून 'तुम्हारी बेटीने फांसी ली, सरकारी दवाखाने में जल्दी आओ...' अशी माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.

शेख मुस्कान शेख शाहेद (वय २०) असे मयत महिलेचे नाव असून शेख शाहेद शेख रूक्मुद्दीन (वय २२ दोघेही रा.पात्रूड ह.मु.युनूस पार्क, बीड) असे आरोपीचे नाव आहे. साधारण दीड वर्षापूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. परंतू घरगुती वाद झाल्याने हे दोघही सहा महिन्यांपूर्वी बीडमध्ये राहण्यास आले. तेलगाव नाका परिसरातील युनूस पार्कमध्ये त्यांनी किरायाने खोली केली. शाहेद हा भंगार गोळा करण्याचे काम करत होता. अशातच त्यांच्यात पात्रूड येथील सामान आणण्यावरून वाद सुरू झाले. ५ एप्रिल रोजीही रात्री त्यांच्यात वाद झाले होते. याच वादातून सकाळी साडे आठ वाजता शाहेदने पत्नीचा गळा आवळून खून केला. 

नंतर त्यानेच पत्नीला जिल्हा रूग्णालयात दाखल करत सासऱ्याला माहिती दिली. परंतू शवविच्छेदन अहवालातील मुद्दे, महिलेच्या अंगावरील जखमा, गळ्याचे व्रण पहाता ही आत्महत्या नसून खून असल्याचे समोर आले. त्याच अनुषंगाने महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शेख शाहेद विरोधात पेठबीड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अटक असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी सांगितले.

Web Title: Feigned suicide by killing his wife; The father-in-law was called to the hospital and a police exposed murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.