छावणी चालकांचा घोड्यावर बसवून केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:37 PM2019-06-01T23:37:27+5:302019-06-01T23:38:04+5:30
दुष्काळामुळे शासनाच्या वतीने सुरु केलेल्या छावण्यांमध्ये पशुधनाला आश्रय मिळाला. काही छावण्या नियम धाब्यावर बसवत असल्याने चर्चेत आल्या. एकीकडे प्रशासनाकडून कारवाया सुरु असताना उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल उमरद खालसा येथे शेतकऱ्यांनी छावणी चालकांचा सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दुष्काळामुळे शासनाच्या वतीने सुरु केलेल्या छावण्यांमध्ये पशुधनाला आश्रय मिळाला. काही छावण्या नियम धाब्यावर बसवत असल्याने चर्चेत आल्या. एकीकडे प्रशासनाकडून कारवाया सुरु असताना उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल उमरद खालसा येथे शेतकऱ्यांनी छावणी चालकांचा सत्कार केला. यावेळी फेटे बांधून छावणीत आकर्षण बनलेल्या एका शेतकºयाच्या ऐटबाज घोड्यावर चालकांना बसवून सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील नागापूर बु. व उमरद खालसा येथे ८० दिवसांपासून बिनदिक्कतपणे छावणी सुरु आहे. नागापूर, उंदरी , चव्हाण वस्ती, उमरद खालसा परिसरातील १७५ शेतकºयांची ६०० जनावरे आहेत. रोज ८ ते १० टन हिरवा चारा, कडबा, ऊस, कडुळे, टॅँकरने पाण्याची व्यवस्था येथे केली आहे. १ जून रोजी शेतकºयांनी या आदर्श छावणी म्हणून नारा देत सरपंच बापूराव जाधव, विक्रम परसकर, परमेश्वर जाधव, रामचंद्र चव्हाण यांचे कौतुक केले. शेतकºयांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल चालकांनी समाधान व्यक्त केले.