धारूर तहसीलमध्ये निवेदन घेण्यास अधिकारी नसल्याने महिला आंदोलक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 04:31 PM2018-12-11T16:31:03+5:302018-12-11T16:34:41+5:30
कार्यालयात एकही अधिकारी निवेदन घेण्यासाठी नसल्याने महिला आक्रमक झाल्या.
धारूर : धारूर तहसील कार्यालयावर सोमवारी माकपच्यावतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मात्र कार्यालयात एकही अधिकारी निवेदन घेण्यासाठी नसल्याने महिला आंदोलक आक्रमक झाल्या. आंदोलक महिलांनी थेट तहसीलदारांच्या कक्षात जात गोंधळ घातला.
तब्बल दीड तासापासून हे आंदोलनतहसीलदारांच्या कक्षात सुरू आहे. दुपारी सव्वा चार वाजेपर्यंत एकही अधिकारी निवेदन घेण्यासाठी आलेला नव्हता. तर दुसऱ्या बाजूला मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असतानाही धारूर पोलिसांकडूनही एकही महिला कर्मचारी याठिकाणी बंदोबस्तासाठी नियूक्त केली नव्हती. या आंदोलनाच्या निमित्ताने धारूरमधील महसूल व पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.