खताच्या साठ्यात तफावत, चौसाळा येथील कृषी केंद्राचा परवाना निलंबित

By शिरीष शिंदे | Published: June 22, 2024 12:10 PM2024-06-22T12:10:55+5:302024-06-22T12:12:31+5:30

युरिया खताचा मशीनवरील साठा व प्रत्यक्ष साठा याच्यात मोठा फरक दिसून आला आढळून आला. 

Fertilizer stock discrepancy, license of agricultural center at Chausala suspended | खताच्या साठ्यात तफावत, चौसाळा येथील कृषी केंद्राचा परवाना निलंबित

खताच्या साठ्यात तफावत, चौसाळा येथील कृषी केंद्राचा परवाना निलंबित

बीड : तालुक्यातील अमोल कृषी सेवा केंद्राचा परवाना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी १९ जून रोजी निलंबित केला आहे. खत नियंत्रण आदेशातील तरतुदीचा व परवान्यातील अटी व शर्थीचा भंग केल्याचे दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली. 

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी चौसाळा आणि लगतच्या भागातील खत, बियाणे विकणाऱ्या कृषी दुकानांची तपासणी बुधवारी दुपारी केली होती. योग्य दराने खत व बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, याची पडताळणी केली. दरम्यान, अमोल कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता खताचा साठा, भाव फलक व साठा बुक यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली. तसेच दुकानाची सर्व तपासणी केली असता, युरिया खताचा मशीनवरील साठा व प्रत्यक्ष साठा याच्यात मोठा फरक दिसून आला आढळून आला. 

यावेळी जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक कल्याण अंबुरे, बीडचे तालुका कृषी अधिकारी बी. आर. गंडे, कृषी पर्यवेक्षक सतीश मिटकरी व संतोष काशीद यांची उपस्थिती होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्या आदेशान्वये अमोल कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.

Web Title: Fertilizer stock discrepancy, license of agricultural center at Chausala suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.