सहवासीत कमी, नवे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:01+5:302021-05-22T04:31:01+5:30
शिरूर कासार : तालुक्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांचा आकडा घटला असल्याने दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे बाधित ...
शिरूर कासार : तालुक्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांचा आकडा घटला असल्याने दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे बाधित रुग्णही वाढत असून सहवासीत फक्त ९ रुग्ण असल्याचे दिसून येते.
तालुक्यात बुधवारी कोरोनाचे ४९ रुग्ण होते. मात्र, गुरुवारी हा आकडा एकदम १२८ वर गेला होता. शुक्रवारी तो ७६ वर इतका खाली आला असल्याने अल्पसा दिलासा मिळाला आहे.
माती काढून माळवदाच्या घरावर स्लॅब
शिरूर कासार : लाकडी व मातीच्या माळवद घरावरील माती काढून त्यावर सिमेंटचा स्लॅब टाकण्यावर भर दिला जात आहे. पाऊस सुरू झाला की घराला गळती लागते व कुटुंबाला त्रासाला सामोरे जावे लागते त्याला पर्याय म्हणून सिमेंट स्लॅबला पसंती दिली जात आहे.
तुराट्या चुलीला जळणासाठी
शिरूर कासार : गॅसचे वाढते दर आता सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यावर उपाय म्हणून आता ग्रामीण भागात विशेषत: शेतकरी शेतातील तुराट्या गोळा करून चुलीसाठी वापर करत आहे. यंदा तुरीचे झाडदेखील चांगलीच वाढली होती. त्याला जळण म्हणून पसंती दिली जात आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत
शिरूर कासार : शहराला पाणीपुरवठा वेळापत्रक विजेच्या पुरवठ्याअभावी घडी बसत नसल्याने नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करण्यात मोठा व्यत्यय येत आहे. कायमस्वरूपी यावर तोडगा काढून पाणी वेळेवर सोडण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
बैलनांगर दुर्मीळ; ट्रॅक्टर वापरावर भर
शिरूर कासार : शेती शेतकरी आणि बैलबारदाना हे समीकरण पूर्णपणे बदलले असून आता घंट्याचे काम मिनिटांवर होत असल्याने बैलाऐवजी शेतकरी सर्वच कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करत असल्याचे दिसून येते. चार सहा आठ बैल नांगर आता दिसेनासा झाले आहे.