नदीपात्रातील टरबूज, खरबूजवाड्यांची जागा शेताने घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:11+5:302021-05-21T04:35:11+5:30

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील सिंदफणा व गोदावरी नदीपात्रात २० वर्षांपूर्वी खरबूज व टरबूजवाड्यासह काकड्यांचेही उत्पादन घेतले जात ...

The field replaced the watermelon and melon plantations in the river basin | नदीपात्रातील टरबूज, खरबूजवाड्यांची जागा शेताने घेतली

नदीपात्रातील टरबूज, खरबूजवाड्यांची जागा शेताने घेतली

Next

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील सिंदफणा व गोदावरी नदीपात्रात २० वर्षांपूर्वी खरबूज व टरबूजवाड्यासह काकड्यांचेही उत्पादन घेतले जात होते. कालांतराने या नदीपात्रात मोठे बंधारे झाले. त्यामुळे पात्रात बारमाही पाणी राहत असल्याने टरबूज, खरबूज व काकड्यांची लागवड बंद झाली. सध्या या टरबूजवाड्यांची जागा शेतीने घेतली आहे.

उन्हाळा चालू झाला की सर्वांना आंबट व थंड पदार्थ खावे वाटतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला द्राक्षांची मागणी असते. त्यानंतर कैऱ्या, आंबे बाजारात उपलब्ध असतात. त्याच दरम्यान टरबूज व खरबुजांची मागणी जोर धरते. २०-२२ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात नदीपात्रात छान वेली दिसायच्या. त्यामुळे कडक उन्हातही वाळूत गार गार जाणवायचे. या ठिकाणी छोट्या-छोट्या कोप्या करून आपल्या कुटुंबासह राहणारे भोई समाजाचे लोक डिसेंबर - जानेवारीत नदीपात्रातील पाणी ओसरताच टरबूज, खरबूज व काकडीची लागवड करीत असत. एप्रिल - मे महिन्यांत कडक उन्हात या फळांना बाजारात चांगलीच मागणी असायची. फळे मोठे होताच हे लोक वेगवेगळ्या वाहनांनी आठवडी बाजारातही फळे विकत घ्यायचे. गोदावरी नदीपात्रातील फळ हे अत्यंत गोड व चवीला चांगले असायचे. यामुळे पाहता पाहता ही फळे बाजारात संपून जायची.

मागील १५-२० वर्षांत माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रावर मोठी बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे या नदीपात्रात बारमाही पाणी राहत असल्याने या पात्रात टरबूज, खरबूज व काकडी पीक घेणे बंद झाले.

यामुळे या भोईसमाजावर उपासमारीची वेळ येऊ लागली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज व खरबुजाची पिके घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीस शेतकऱ्यास भीती वाटत असे. परंतु, कालांतराने या फळाचे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व बाजारपेठ मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग या पिकाकडे वळला. हे पीक घेत असताना जवळपास ७० ते ७५ टक्के शेतकरी हे भोई समाजातील लोकांना आपल्या शेतात हे पीक घेण्यास सांगतात. दोघांना निम्मे निम्मे उत्पन्न मिळते. याद्वारे शेतकऱ्यांसह भोई समाजातील नागरिकांची याद्वारे चांगल्याप्रकारे उपजीविका होऊ लागली.

भरावा लागत असे महसूल कर

तालुक्यातील सिंदफना, कुंडलिका व गोदावरी पात्रात टरबूज, खरबूज व काकडीची लागवड काही वर्षांपूर्वी केली जात असे. यातील सर्वच उत्पन्न आम्हालाच मिळत असे व मिळणाऱ्या उत्पन्नातून फक्त कर तहसील कार्यालयात भरावा लागत होता, असे गुंज खुर्द येथील भोई समाजाचे लाला रावण कुलौवंत यांनी सांगितले.

-

आम्ही अनेक वर्षांपासून शेतात टरबूज व खरबुजाचे उत्पादन घेतो. आम्हाला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते.

--डॉ. सदाशिव सरवदे, शेतकरी

===Photopath===

200521\purusttam karva_img-20210520-wa0032_14.jpg~200521\purusttam karva_img-20210520-wa0033_14.jpg

Web Title: The field replaced the watermelon and melon plantations in the river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.