नागझरीत तलवारबाजी; एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:07 AM2019-04-05T00:07:30+5:302019-04-05T00:08:07+5:30

 जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीतून नंतर तलवारबाजी झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला.

Fierce fighting; Killing one | नागझरीत तलवारबाजी; एकाची हत्या

नागझरीत तलवारबाजी; एकाची हत्या

Next
ठळक मुद्देजुन्या वादातून घडलेली घटना : कंदुरीचे जेवण जिवावर बेतले; एक जण गंभीर जखमी

गेवराई :  जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीतून नंतर तलवारबाजी झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील नागझरी येथे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमी लोक कंदुरीच्या जेवणाच्या कार्यक्रमात असतानाच हा हल्ला झाल्याने सर्वांचीच धावपळ झाली.
उत्तरेश्वर भारत पवार (३५) असे मयताचे नाव असून नारायण भारत पवार हा गंभीर जखमी आहे. नारायणच्या डोक्यात खोलवर वार झालेला असून पाठीवर आणि पोटावरही तलवारीचे वार असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास भारत पवार यांच्या शेजाऱ्याच्या शेतात कंदुरीचा कार्यक्रम होता. पवार कुटुंब तेथे जेवणासाठी गेले होते. बीडमध्ये राहणारा उत्तरेश्वरही या कार्यक्रमाला आला होता. जेवण सुरू असतानाच पाच ते सहा जण अचानक धावत आले आणि पवार यांच्यावर हल्ला चढविला. काही समजण्याच्या आतच कुºहाड, तलवारीने समोर उभा असलेल्या उत्तरेश्वरवर हल्ला चढविला. यामध्ये तो जागीच ठार झाला. तर त्याला वाचविण्यासाठी धावलेला त्याचा भाऊ नारायण याच्यावरही त्यांनी हल्ला चढविला. यामध्ये नारायणच्या डोक्यात तवारीचा खोलवर वार गेला. तसेच पोटावर आणि पाठिवरही तलवारीने हल्ला केला. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात तो पडला. याचवेळी संगीता साईनाथ चव्हाण आणि शिवकन्या नारायण पवार या दोघींनाही त्यांनी मारहाण करून तेथून पळ काढला.
उपस्थित लोकांनी जखमींना तात्काळ गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. येथे नारायणवर उपचार सुरू होते. तलवारीचे वार खोलपर्यंत गेलेला असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
नागझरी येथील वादाचे कारण मात्र उशिरापर्यंत समोर आले नाही. जखमींनी समोरच्यांनी जुन्या वादातून आमच्यावर हल्ला केल्याचे सांगितले.
तिघांना घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच या भागात दरोड्याचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील दोन मुख्य हल्लेखोरांना अर्धा तासात बेड्या ठोकल्या. सपोनि अमोल धस, साजिद पठाण, सखाराम पवार यांचा या पथकात समावेश होता. तर एकाला गेवराई पोलिसांनी पकडले. ते सध्या गेवराई ठाण्यात आहेत.
एसआयडीचे पथक तळ ठोकून
जखमी व मारेकऱ्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. हाच धागा पकडून राज्य गुप्त वार्ताचे (एसआयडी) अधिकारी, कर्मचाºयांनी येथे धाव घेत माहिती काढणे सुरू केले. उशिरापर्यंत ते येथेच तळ ठोकून होते.

Web Title: Fierce fighting; Killing one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.