परळीतील एमआयडीसीमध्ये कुलर कंपनीत भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 07:21 PM2020-12-23T19:21:22+5:302020-12-23T19:26:36+5:30
आगीत कंपनीत असलेले कुलरचे संपूर्ण साहित्य जळाले आहे.
परळी : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये साई एअर कुलर इंडस्ट्रीज मध्ये बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीत कंपनीत असलेले लाखो रुपयांचे कुलरचे संपूर्ण साहित्य जळाले आहे. घटनास्थळी नगरपालिका, वैद्यनाथ साखर कारखाना आणि औष्णिक विद्युत केंद्र येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नगरसेवक, नागरिक यांचे मदतकार्य सुरू आहे. आगडोंब उसळल्याने या भागात नागरिकांची प्रंचड गर्दी जमली आहे.
येथील कुलर चे व्यापारी सुनील सोळंके यांचे शहरातील वैद्यनाथ औद्योगिक वसाहती मध्ये साई एअर कुलर इंडस्ट्रीज नावाचा कुलरच्या कारखाना आहे .या कारखान्यास बुधवारी सायंकाळी अचानक आग लागली. लागलीच तेथील कामगारांनी आरडा ओरड सुरू करून मदती साठी शेजाऱ्यांना हाक दिली.. आगीची माहिती कळताच परळी न प चे गटनेते वाल्मीक कराड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे,नगर सेवक चंदुलाल बियाणी ,राजा खान, भाजपाचे शहरध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नरसिंग सिरसाठ आदींनी धाव घेतली.
कुलरच्या कारखान्याशेजारीच कपाट कारखाना व ऑइल मिल आहे. एमआयडीसीमधील सर्व उद्योजकही आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण आणि किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते.