गेवराई तालुक्यातील पंधरा गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:27 AM2018-10-06T00:27:19+5:302018-10-06T00:27:51+5:30
तालुक्यातील लुखामसला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील ५ एमव्ही पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे रेवकी-देवकी सर्कलमधील पंधराहून अधिक गावे पाच दिवसांपासून अंधारात आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील लुखामसला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील ५ एमव्ही पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे रेवकी-देवकी सर्कलमधील पंधराहून अधिक गावे पाच दिवसांपासून अंधारात आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सध्या उजव्या कालव्याला पाणी सोडलेले असताना विजेअभावी शेतीपंप बंद असल्याने पिकांचे देखील नुकसान होत आहे. तरी याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
यावर्षी पावसाअभावी शेतकरी हवालदिल झालेला आहे.
दरम्यान, सध्या शेतीसाठी पैठणच्या धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडलेले आहे. तालुक्यातील रेवकी सर्कमधील १५ हून अधिक गावातून हा कालवा गेलेला असून, हा कालवा सध्या तुडूंब भरु न वाहत आहे. मात्र रेवकी सर्कमधील गावांना वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या लुखामसाला येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील पाच एमव्हीचा ट्रान्सफार्मर पाच दिवसांपूर्वी जळाला आहे.
विजेअभावी शेतीपंप बंद आहेत. परिणामी शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील दळणवळणासह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज ट्रान्सफार्मर दुरुस्त करुन प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे. १५ हून अधिक गावे अंधारात असताना देखील महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दोन दिवसात ट्रान्सफार्मर कार्यान्वित करा
एकीकडे पाऊस नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. तर कालव्याला पाणी आलेले असताना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना शेतकºयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे याप्रकरणी आ. लक्ष्मण पवार, रेवकी गटाच्या जि.प. सदस्या सविता बाळासाहेब मस्के यांच्याकडे शेतकºयांनी गाºर्हाणे मांडताच त्यांनी दोन दिवसांत लुखामसाला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील जळालेला ट्रान्सफार्मर कार्यान्वित करा, असे आदेश वीजवितरण कार्यालय, बीड यांना दिले आहेत. यावेळी या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.