पन्नास हजार हेक्टर खरीप पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:34+5:302021-07-10T04:23:34+5:30

दुबार पेरणीचे अस्मानी संकट टळले शिरूर कासार : तालुक्यात पावसाने सुरुवातच चांगली केल्याने खरिपाच्या पेरण्या व कापूस लागवड झाली. ...

Fifty thousand hectares of kharif crop saved | पन्नास हजार हेक्टर खरीप पिकाला जीवदान

पन्नास हजार हेक्टर खरीप पिकाला जीवदान

Next

दुबार पेरणीचे अस्मानी संकट टळले

शिरूर कासार : तालुक्यात पावसाने सुरुवातच चांगली केल्याने खरिपाच्या पेरण्या व कापूस लागवड झाली. नंतर उगवणदेखील समाधानकारक झाल्याने मशागतही केली; मात्र गेल्या दहा-बारा दिवसांपासून उन्हाळा असल्याची जाणीव होत होती. पिके माना टाकू लागल्याने दुबार पेरणीचे संकट येते की काय, अशी भीती वाटत असतानाच दोन दिवसांपासून वातावरण बदलले. बुधवारी, गुरुवारी झालेल्या दमदार पावसाने शेतशिवारात चैतन्य निर्माण करून ४५, ९७३ हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले असल्याने शेतकरी सुखावला आहे .

तालुक्यात खरीप हंगाम जसा सुरू झाला, तसा शेतक-यांनी पडलेल्या पावसाचा फायदा घेत लागवड व पेरणीचे काम उरकले. पुढे त्याची मशागतदेखील झाली. आता पिकांची भूक वाढली होती, तर कडक ऊन व पावसाने दडी मारल्याने चिंतेचे सावट पसरले होते. दोन दिवसांपासून पुन्हा एकदा वातावरण बदलले आणि पाऊसदेखील समाधानकारक झाल्याने सर्व प्रश्नार्थक चिन्ह संपुष्टात आले .

तालुका कृषी कार्यालयाकडून खरीप पेरणी अहवालाच्या प्राप्त आकडेवारीनुसार चार मंडलाअंतर्गत ४५,९७३ हेक्टरवर पेरा झाला आहे. यावर्षीही शेतक-यांनी कापसालाच पसंती दाखवली असल्याचे दिसून येते. २५, २८१ हेक्टरवर कापूस लागवड झाल्याचा नजरी अंदाज असून, उर्वरित क्षेत्रावर बाजरी ५१३५ हेक्टर, मका ३१७, तूर ७८३२ , मूग १०७९, उडीद २२९० , भुईमूग १०४४, तीळ ६०, कारळ ३८, तर सोयाबीनचा पेरा २८९७ हेक्टर असा एकूण ४५,९७३ हेक्टर पेरा झाला असल्याचे सांगितले.

प्रमाणात पडलेल्या पावसानंतर खंड पडला आणि पुन्हा एकदा शेतकरी धास्तावला होता. आधीच कोरोना संकटाने त्रस्त असताना, दुबार पेरणीचे संकट येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र रात्री झालेल्या पावसाने शेतशिवारातील पिकांना जीवदान मिळाले व हिरवे चैतन्य पसरले, तर शेतकरी सुखावला असल्याचे दिसून येते .

ऐन गरजेच्यावेळी पिकाला आवश्यक पाऊस झाला असून, आता शेतक-यांनी संभाव्य रोगराईकडे लक्ष केंद्रित करावे, रोगांचा प्रादुर्भाव दिसताच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार औषध फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांनी केले आहे.

090721\img20210709150633.jpg

फोटो

पावसामुळे पिकांना चैतन्य

Web Title: Fifty thousand hectares of kharif crop saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.