ही लढाई कार्यकर्ता विरु द्ध कर्मचारी- रमेश आडसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:17 AM2019-10-17T00:17:59+5:302019-10-17T00:18:37+5:30

मंगळवारी सायंकाळी भाजप उमेदवार रमेश आडसकर यांनी पवारवाडी, आनंदगाव, आबेगाव, बोरगाव, मोठेवाडी, सोमठाना, छोटेवाडी येथे कॉर्नर बैठका घेतल्या.

This fight is against activist - Ramesh Adaskar | ही लढाई कार्यकर्ता विरु द्ध कर्मचारी- रमेश आडसकर

ही लढाई कार्यकर्ता विरु द्ध कर्मचारी- रमेश आडसकर

Next

माजलगाव : माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांकडे कार्यकर्ता शिल्लक राहिलेला. तसेच त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने त्यांनी जनतेचा बुद्धीभेद करण्याचे काम केले आहे. ही निवडणूक कार्यकर्ता विरु द्ध कर्मचारी अशी असल्याचे प्रतिपादन भाजप उमेदवार रमेश आडसकर यांनी कॉर्नर बैठकीत केले.
मंगळवारी सायंकाळी भाजप उमेदवार रमेश आडसकर यांनी पवारवाडी, आनंदगाव, आबेगाव, बोरगाव, मोठेवाडी, सोमठाना, छोटेवाडी येथे कॉर्नर बैठका घेतल्या. गावकऱ्यांनी या कॉर्नर बैठकांना उदंड प्रतिसाद दिला. आनंदगाव, बोरगाव, आबेगावात रमेश आडससकरांची सवाद्य मिरवणूक काढली. बोरगावात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आडसकर म्हणाले, भाजपला जनतेची पसंती आहे. विरोधकांकडे कुठलाही मुद्दा शिल्लक नसल्याने त्यांनी जनतेचा बुद्धीभेद करणे सुरू केले आहे.
आमच्याकडे मतदारसंघाच्या विकासाचे निश्चित धोरण आहे व त्या धोरणाला तोरण लावण्यासाठी कणखर नेतृत्वही असल्याने जनतेने निवडणुकीत भाजपला पसंती दिली आहे. विरोधकाकडे कार्यकर्ता राहिला नसल्याने त्यांची भिस्त त्यांच्या कर्मचाऱ्यांवरच आहे. ही निवडणूक कार्यकर्ताविरुद्ध कर्मचारी असून, कार्यकर्ताच विजयी होईल, असे आडसकर म्हणाले.
मी केवळ माध्यम, जनता व पक्ष महत्त्वाचा - आडसकर
नरेंद्र मोदींच्या विकासाच्या भूमिकेमुळे राजकारणाची परीभाषाच बदलली असून आता गट, तट लॉबिंग या विषयाला काहीही महत्व राहिले नाही. विकास ही एक सामाजिक चळवळ झाली असून, विकासाच्या मुद्यावरच मी निवडणुकीत जनतेच्या समोर असून निवडणुकीत विजय मिळणार आहे. मी केवळ निमित्तमात्र असून, पक्षाचे ध्येयधोरण व जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे हेच माझे धोरण राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकी दरम्यान भाजप नेते मोहन जगताप, माजी सभापती नितीन नाईकनवरे, शिवाजीराव रांजवण, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: This fight is against activist - Ramesh Adaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.