झुंज संपली ! विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 04:37 PM2021-10-13T16:37:07+5:302021-10-13T16:37:31+5:30
दिलीप भोसले याने मंगळवारी सकाळी विष प्राशन केले होते
गेवराई ( बीड ) : तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील एका 24 वर्षीय तरुणाने मंगळवारी विष प्राशन केले होते. त्याचा उपचारा दरम्यान आज मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. दिलीप भगवान भोसले ( 23) असे मृताचे नाव आहे.
दिलीप भोसले याने मंगळवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याचे नातेवाईकांना लक्षात येताच त्यांनी दिलीपला उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरु असताना आज सकाळी दिलीपचा मृत्यू झाला. दिलीपच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीपच्या पश्चात आई , वडील, दोन मोठे भाऊ असा परिवार आहे.
भर दुपारी व्यापाऱ्यास लुटले
गेवराई शहरातील महेश कॉलनी येथे राहणारे गंगाभिषण बिहारीलाल भुतडा ( ५९ ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगाभिषण भुतडा यांचे श्रीनिवास भुसार (कडधाण्याचे) मालाचे दुकान मोंढा भागात आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता दुचाकीवरून घराकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी आवाज देऊन थांबवले. आम्ही गुन्हे शाखेचे असून तुम्हाला दोनदा आवाज दिले, तुम्ही थाबले नाहीत. सोमवारी रात्री ५ ते६ लाखाचा गांजा पकडला असून या प्रकरणी तुमची चौकशी करायची आहे अशी थाप मारली. यानंतर त्या दोघांनी भुतडा यांना रुमाल काढण्यास सांगून त्यात अंगावरील दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल ठेवण्यास सांगितले. हातचलाखी करत त्यांनी दागिने व रक्कम काढून घेत मोबाईल भूतडांना परत केला.