विहिरीतील पाणी दूषित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:31 AM2021-04-14T04:31:02+5:302021-04-14T04:31:02+5:30
केवड येथील बाळासाहेब पटाईत यांनी पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या शेतात विहीर खोदली, या विहिरीला पाणीही लागले. दरम्यान, १२ ...
केवड येथील बाळासाहेब पटाईत यांनी पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या शेतात विहीर खोदली, या विहिरीला पाणीही लागले. दरम्यान, १२ एप्रिल रोजी पटाईत हे लातूरला गेले होते. तेथून परत गावी आल्यानंतर १३ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता शेतात गेले असता, त्यांना विहिरीतील पाणी लालसर पिवळे रंगाचे झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांची पत्नी अंजना यांना विहिरीवर कोणी आले होते काय, याची विचारणा केली. पत्नीने आपण शेतात गेले नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी विहिरीतील पाणी रंगीत झाल्याची माहिती पोलीस पाटील उद्धव शिंदे यांना दिली. बाळासाहेब पटाईत यांनी या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून इच्छापूर्वक पाणी दूषित करून घाण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. अमोल गायकवाड करीत आहेत.