अखेर २६ तासानंतर नदीपात्रात पडलेल्या तरूणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 08:25 PM2023-12-04T20:25:02+5:302023-12-04T20:25:11+5:30
आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील घटना
- नितीन कांबळे
कडा- अचानक चक्कर येऊन पुलावरून नदीपात्रात पडलेल्या एका ४० वर्षीय तरूणाचा मृतदेह २६ तासानंतर पुणे येथील नेव्हीच्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले. राजेंद्र बापुराव पवळ (४०) असे मृत तरूणाचे नाव आहे
आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील राजेंद्र बापुराव पवळ हा ४० वर्षीय तरूण रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान गावालगत असलेल्या पुलावरून घराकडे येत होता. पुलावर येताच अचानक चक्कर आल्याने नदीपात्रात तो पडला. हा प्रकार गावातील एका तरूणाने पाहिल्यानंतर त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर नदीपात्रात ग्रामस्थांकडून शोधकार्य सुरू होते.
लोंखडी गळ, ट्युब वापरत पट्टीच्या पोहणार्या तरूणांनी शोध घेतला. तसेच बीड नगर परिषेदेच्या कर्मचाऱ्यांनी देखील शोध घेतला पण तरूण मिळून आला नाही.अखेर नेव्ही मधील दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असतं तब्बल २६ तासानंतर तरुणाचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलिस हवालदार अशोक शिंदे, पोलीस नाईक संतोष दराडे, पोलीस शिपाई बिभीषण गूजर यांनी भेट दिली.