अखेर खूर्ची सुटली; बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:33+5:302021-09-22T04:37:33+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काही कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतरही त्यांना खूर्ची सुटत नव्हती. याबाबत कर्मचारी संघटनेने तक्रार करताच ...
बीड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काही कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतरही त्यांना खूर्ची सुटत नव्हती. याबाबत कर्मचारी संघटनेने तक्रार करताच 'लोकमत'ने आवाज उठविला होता. यावर प्रशासन खडबडून जागे झाले आणि संबंधितांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पुरूषांची आस्थापना सांभाळणाऱ्या महिला कर्मचारी सामान्य प्रशासन विभागात मंगळवारी हजर झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या आस्थापना २ मध्ये पुरूषांची कामे आहेत. याचा कारभार महिला कर्मचाऱ्याच्या हाती होता. त्यांची काही दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सामान्य प्रशासन विभागात बदली केली. परंतु तरीही त्यांनी खूर्ची सोडलेली नव्हती. याबाबत कर्मचारी संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी 'लोकमत'ने ‘पुरूष आस्थापनेचा कारभार महिले’कडे या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. मंगळवारी याच महिला कर्मचाऱ्याला सामान्य प्रशासन विभागात हजर होण्यास सांगितले. आता आस्थापना २ हे पद रिक्त झाले असून, इतरांकडे पदभार दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या बदलीमुळे कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
---
आस्थापना २मधील कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रूजू झाल्या आहेत. आता या विभागाचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून इतर कर्मचाऱ्याकडे सोपविला जाईल. आणखी कोणाकडेच पदभार दिला नाही.
डॉ. रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
210921\21_2_bed_17_21092021_14.jpg
१६ सप्टेंबर रोजी लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त.