सानेगुरूजी मंडळातर्फे कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:57+5:302021-05-22T04:30:57+5:30
यावेळी अमरसिंह पंडित यांनी कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे सांत्वन करून त्यांना धीर आणि आधार दिला. जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ...
यावेळी अमरसिंह पंडित यांनी कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे सांत्वन करून त्यांना धीर आणि आधार दिला.
जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक विद्यालय, रामपुरी येथील शिक्षक नामदेव एकनाथ मराठे, माध्यमिक विद्यालय, तलवाडा येथील शिक्षक गजानन चंद्रभान नाटकर, माध्यमिक विद्यालय, धोंडराई येथील सेवक शेख राजू अजीज यांचे नुकतेच कोरोनामुळे दुःखद निधन झाले होते. याप्रसंगी जयभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या हस्ते प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश गजानन नाटकर यांच्या पत्नी मनीषा नाटकर, शेख राजू यांच्या पत्नी शामिना राजू आणि नामदेव मराठे यांचे प्रतिनिधी राजेश पेजगुडे यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक काशिनाथ गोगुले, मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, भक्तराज पौळ, अशोक तौर, श्रीराम शेळके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
210521\sakharam shinde_img-20210520-wa0035_14.jpg
===Caption===
जयभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या हस्ते प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश गजानन नाटकर यांच्या पत्नी मनिषा नाटकर, शेख राजू यांच्या पत्नी शामिना राजू आणि नामदेव मराठे यांचे प्रतिनिधी राजेश पेजगुडे यांना सुपूर्द करण्यात आला.