तपासात आर्थिक तडजोड भोवली; बीड सायबरचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले निलंबित
By सोमनाथ खताळ | Updated: March 26, 2025 11:51 IST2025-03-26T11:50:35+5:302025-03-26T11:51:54+5:30
या घटनेमुळे बीड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

तपासात आर्थिक तडजोड भोवली; बीड सायबरचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले निलंबित
बीड : सायबर विभागात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी हा निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
रणजित कसले हे सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी बाहेर राज्यात गेले असताना, त्यांनी संबंधित प्रकरणात आर्थिक तडजोड केल्याचा आरोप करण्यात आला. हे प्रकरण स्थानिक पातळीवर न थांबता थेट राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. चौकशीत त्यांची दोषी असल्याची पुष्टी झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
या घटनेमुळे बीड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत यांनी चुकीच्या कृत्यांवर कठोर भूमिका घेत आणखी एका अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.