अंबाजोगाईत एकाच दिवसात ५५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:51+5:302021-05-05T04:54:51+5:30

अंबाजोगाई : शहरात सोमवारी दिवसभरात सहा पथकांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या २३५ जणांच्या ॲन्टिजन टेस्ट केल्या. यात ११ ...

A fine of Rs 55,000 was collected in a single day in Ambajogai | अंबाजोगाईत एकाच दिवसात ५५ हजारांचा दंड वसूल

अंबाजोगाईत एकाच दिवसात ५५ हजारांचा दंड वसूल

googlenewsNext

अंबाजोगाई : शहरात सोमवारी दिवसभरात सहा पथकांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या २३५ जणांच्या ॲन्टिजन टेस्ट केल्या. यात ११ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर मास्क न वापरणे, विविध नियमांचे पालन न करणे अशा विविध नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईपोटी एकाच दिवसात ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नेमले. सोमवारी सकाळी अपर जिल्हाधिकारी मजुंषा मिसकर, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उप-जिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील, गटविकास अधिकारी संदीप घोणशिकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे, गटशिक्षण अधिकारी चंदन कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार व पथकातील कर्मचारी यांनी विविध ठिकाणी कारवाईस सुरुवात केली.

शहरातील सावरकर चौक परिसर, सदर बाजार, छत्रपती शिवाजी चौक व विविध ठिकाणी फिरणाऱ्या २३५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. विविध पथकांनी २३५ नागरिकांची ॲन्टिजन टेस्ट केली. या ॲन्टिजन टेस्टमध्ये ११ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर शहरात मास्कचा वापर न करणे बंदचे आदेश असताना ही दुकान उघडे ठेवणे, कारण नसताना घराबाहेर फिरणे अशा १५३ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईपोटी १५३ जणांकडून ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विनाकारण घराबाहेर तर कारवाई होणारच

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे पालन नागरिकांनी करावे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये अत्यावश्यक काम असेल तर आवश्यक त्या ठिकाणी जाण्यासाठी मुभा आहे; मात्र अनेक जण विनाकारण शहरात गर्दी करू लागले आहेत. ही गर्दी व संसर्ग रोखण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत. विनाकारण घराबाहेर पडाल तर कारवाईला सामोरे जावे लागेल - मंजुषा मिसकर, अपर जिल्हाधिकारी.

फोटो : सोमवारी अंबाजोगाईत विनाकारण फिरणाऱ्यांची ॲन्टिजन टेस्ट तसेच दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी मजुंषा मिसकर, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उप-जिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटीलसह इतर अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते.

===Photopath===

030521\avinash mudegaonkar_img-20210503-wa0086_14.jpg

Web Title: A fine of Rs 55,000 was collected in a single day in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.