धारूर येथील बालाजी जिंनीगवर आग; नऊ हजार क्विंटल कापसाचे नूकसान; तीन तासात आग अटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:59+5:302021-01-01T04:22:59+5:30
ही आग कशाने लागली हे माञ समजू शकले नाही. धारूर येथील आडस रस्त्यावरील बालाजी जिनिंग-प्रेसिंग वरील कापसाला सकाळी ...
ही आग कशाने लागली हे माञ समजू शकले नाही.
धारूर येथील आडस रस्त्यावरील बालाजी जिनिंग-प्रेसिंग वरील कापसाला सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीने पूर्णपणे तांडव माजवले होते व भयानक होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी धारूर, कळंब, तेलगाव, परळी, अंबाजोगाई , गेवराई आदी सहा ते सात ठिकाणच्या अग्नीशामक दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. मात्र कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खरेदी केंद्रावर १६ हजार क्विंटलपेक्षा जास्त कापसाची खरेदी झाली असून यापैकी सात हजार क्विंटल कापसाची जिनींग करून गाठी तयार करण्यात आल्या आहेत तर नऊ हजार क्विंटल कापसाचे गंजीला आग लागली. या आगीत कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा माञ समजू शकला नाही. आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी उपस्थित शेतकरी यांनी ही मोठ्या प्रमाणात मदत करत होते.