कारंजा भागात पुस्तकाच्या दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:32 AM2018-11-19T00:32:08+5:302018-11-19T00:32:54+5:30
शहरातील कारंजा भागातील एका पुस्तकाच्या दुकानास शॉटसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखोंच्या किंमतीची पुस्तके जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. रविवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील कारंजा भागातील एका पुस्तकाच्या दुकानास शॉटसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखोंच्या किंमतीची पुस्तके जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. रविवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
कारंजा भागात नुमान बुक डेपो या दुकानातून धुराचे लोळ बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांना दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. तातडीने या घटनेची माहिती न.प.च्या अग्निशामक दलाला देण्यात आली. पोलीस प्रशासनालाही कळविण्यात आले. त्यानंतर बीड शहर आणि शिवाजीनगर ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दुकानाजवळ नागरिकांची मोठी गर्दी केली होती. दरम्यान या दुकानालगत चिकटून इतर दुकाने असल्याने ही आग या दुकानापर्यंत पोहोचते की काय अशी भीती निर्माण झाली होती. परंतु अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने बुक डेपोला लागलेली आग पाण्याचे फवारे मारून आटोक्यात आणली. दरम्यान विद्युत वितरण कंपनीचे खांब व वीज प्रवाह सुरू असल्याने तारा दुकानाजवळून गेलेल्या असल्याने आग विझविण्यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.