डाकेपिंप्रीत तारांच्या घर्षणाने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:15 AM2019-05-31T00:15:20+5:302019-05-31T00:15:53+5:30

तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली.

A fire with draped wire strings | डाकेपिंप्रीत तारांच्या घर्षणाने आग

डाकेपिंप्रीत तारांच्या घर्षणाने आग

googlenewsNext
ठळक मुद्दे५० ते ६० लाखांचे नुकसान : शेतकऱ्यांचे पशुधन वाचले; चारा जळून झाला खाक

माजलगाव/ गंगामसला : तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पशुधन वाचले, मात्र चारा जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.
डाके पिंपरी हे तालुक्यातील सधन गाव असून, गावाला गोदाकाठ लाभल्यामुळे शेतकरी देखील प्रगत आहेत. परंतु गावाला दृष्ट लागावी अशी घटना गुरुवारी दुपारी घडली. नदीच्या कडेला असलेल्या विद्युत तारांच्या घर्षणातून आगीच्या ठिणग्या पडल्यामुळे अचानक आग लागली. ही बाब गावकºयांच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले आणि गावकºयांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. गावकºयांनी कोठ्यांना आगी लागत असल्याने पशुधन सुरक्षित करुन घेतले. मात्र, गोठ्यालगत असलेल्या कडब्याच्या गंजीला आगी लागत गेल्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या आगीत गोठ्यावरील शेती उपयोगी साहित्य ठिबक संच, ट्रॅक्टरचे साहित्य , पेरणी यंत्र, काढून ठेवलेल्या पाईपलाईन, मोटार आदीसह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. तसेच गावासाठी असलेली पाण्याची टाकी व अडीच हजार कडबा असणाºया ९ ते १० गंजी जळून खाक झाल्या. यात शेतकºयांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सुशील एकनाथ डाके, गोपाळ गंगाधर डाके , पांडुरंग मनोहर डाके, आसाराम तुकाराम डाके, प्रल्हाद शेषेराव डाके, भरत सूर्यकांत डाके, बळीराम भीमराव डाके, आश्रूबा भाऊराव डाके, सतीश दत्तात्रय डाके, गजेंद्र अच्युत डाके आदींसह अनेक शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले.
आग विझविण्यासाठी गावकºयांनी शर्थीचे प्रयत्न केले. कोणी छोट्या विद्युत मोटारी चालू करून तर कोणी हाताने पाणी मारुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच माजलगाव नगर परिषदेचा अग्निशमन बंब देखील वेळेवर पोहोचला. परंतु आग नियंत्रणात येत नव्हती. वृत्त लिहिपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. तर ती अजूनही फैलतच असल्याने परिस्थिती गंभीर होताना दिसत होती.
गावात वीजपुरवठा खंडित झाला असल्याने सद्य परिस्थितीला पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. महावितरणच्या संबंधित अधिकाºयांना फोन केला असता फोन घेण्याचीही तसदी अधिकारी घेत नाहीत. गावाची परिस्थिती भयावह झाली आहे. आम्हाला कोणी वाली आहे का नाही, असे सरपंच गणेश डाके म्हणाले.

Web Title: A fire with draped wire strings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.