गॅस एजन्सीच्या कार्यालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:51 PM2019-03-05T23:51:12+5:302019-03-05T23:52:11+5:30

येथील योगायोग गॅस एजन्सीच्या कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत कागदपत्रांसह लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. ही घटना सोमवार रोजी रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास घडली.

Fire to the gas agency office | गॅस एजन्सीच्या कार्यालयाला आग

गॅस एजन्सीच्या कार्यालयाला आग

Next
ठळक मुद्देलाखोंचे साहित्य भस्मसात : रात्री एकच्या सुमारास लागली आग

माजलगाव : येथील योगायोग गॅस एजन्सीच्या कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत कागदपत्रांसह लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. ही घटना सोमवार रोजी रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास घडली.
शहरातील गजानननगर परिसरात असणारे योगायोग गॅस एजन्सीच्या कार्यालयाला सोमवारच्या रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे निदर्शनास आले. एजन्सी धारक शिवाजी गरड रात्री १० वाजता कार्यालय बंद करून कार्यालयाच्यावरच्या भागात असलेल्या निवासस्थानात गेले. त्यानंतर १ वाजण्याच्या सुमारास शेजारच्या व्यक्तीला ही बाब लक्षात आली त्यानंतर त्यांनी एजन्सीच्या मालकाला उठवले. कार्यालयात शॉर्टसर्किट झाले आणि कार्यालय आगीच्या विळख्यात सापडले. यानंतर गरड यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. यादरम्यान कार्यालयात कागदपत्रांसह गॅस संबंधित असणाऱ्या सर्व साहित्याची होळी झाली होती. सुदैवाने कार्यालयात गॅस सिलिंडर
नसल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत भस्मसात झालेल्या साहित्याचे नुकसान लाखोच्या घरात आहे. अग्निशमन दलाच्या दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या कामी अग्निशमनचे कर्मचारी अनिल भिसे, दत्ता सावंत, निशिकांत टाकणखार, समीर शेख, सतीश क्षीरसागर, किशोर टाकणखार यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Fire to the gas agency office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedfireबीडआग