घराला आग, संसारोपयोगी साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:07+5:302021-05-04T04:15:07+5:30
माजलगाव : शॉर्टसर्किटने घराला आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. ही घटना माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे सोमवारी सकाळी ...
माजलगाव : शॉर्टसर्किटने घराला आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. ही घटना माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
एका दुकानावर मुनीम असलेल्या पांडुरंग बंकट उगले यांचे संपूर्ण कुटुंब आगीच्या घटनेने रस्त्यावर आले आहे. उगले हे चिंचगव्हाण येथे पत्नी, तीन मुली, एक मुलगा अशा कुटुंबासह आठ पत्र्यांच्या घरांमध्ये राहतात. लॉकडाऊन असल्याने त्यांनी आपल्या घरात ५० किलो साखर, ज्वारी, सहा पोते, गहू दोन पोते यासह पाच हजार रुपयांचा किराणा साहित्य आणून ठेवले होते.
सोमवारी उगले यांच्या आईचा दहावा असल्याने, सकाळीच संपूर्ण कुटुंब मंजरथ येथे गेले होते. घरामध्ये इयत्ता चौथी वर्गात शिकणारी रूपाली नावाची मुलगी होती. सकाळी साडेआठच्या सुमारास घरातील कुलरजवळ आवाज झाला. यामुळे मुलगी काय झाले, म्हणून घरात पाहावयास आली. तिला कूलर पेटलेला दिसला. हे पाहताच मुलीने बाहेर धूम ठोकली. आजूबाजूला शेजाऱ्यांना तिने सांगितले. तोपर्यंत आगीने पेट घेतला होता.
...
एक तासानंतर आग आटोक्यात
घरामध्ये असलेले टीव्ही, कूलर, मिक्सर, कपडे, सोन्याचे गंठण, बोरमाळ, लहान मुलांचे दागिने व सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. गावकऱ्यांनी आग शमविण्याचा प्रयत्न सुरू ठेवून अग्निशमन दलाला पाचारण केले होते. अखेर एक तासानंतर आग शमली. आगीत संपूर्ण घर खाक झाले आहे.
===Photopath===
030521\purusttam karva_img-20210503-wa0023_14.jpg