परळीच्या बँक कॉलनीत गोळीबार : मरळवाडीचे सरपंच ठार,तर एक गंभीर
By सोमनाथ खताळ | Updated: June 29, 2024 23:54 IST2024-06-29T23:53:16+5:302024-06-29T23:54:04+5:30
गोळीबार कशामुळे झाला, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही.

परळीच्या बँक कॉलनीत गोळीबार : मरळवाडीचे सरपंच ठार,तर एक गंभीर
परळी (जि. बीड) : येथील बँक कॉलनी परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास परळी शहर हादरले. झालेल्या या घटनेत मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे ठार झाले तर गोट्या गित्ते (रा. नंदागौळ) हा युवक गंभीर जखमी झाला. दरम्यान, गोळीबार कशामुळे झाला, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही.
घटनेनंतर जखमी गोटया गित्ते यास परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रात्री सव्वा दहाच्या सुमारास रुग्णवाहिकेतून अंबाजोगाईकडे नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात युवकांची गर्दी झाली होती. बँक कॉलनी भागात घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असून उपजिल्हा रुग्णालयात संभाजी नगर पोलिसांनी भेट दिली. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकारी परळीकडे निघाले होते. गोळीबाराची घटना कशामुळे घडली? वाद कोणात झाला, कारण काय आहे, हल्लेखोर कोण आहेत याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे आधिकारी घेत आहेत. बापू आंधळे हे मरळवाडी गावचे अपक्ष म्हणून सरपंच झाले होते.