माजलगावात तेल पॅकिंग युनिटला आग; लाखोंची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 09:42 AM2021-04-15T09:42:22+5:302021-04-15T09:42:48+5:30
आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
माजलगाव : येथील नवीन मोंढयात असलेल्या तेल पँकिंग करणाऱ्या युनिटला गुरुवारी पहाटे अचानक आग लागली. यात करोडो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील नवीन मोंढ्यात संतोष अब्बड यांच्या मालकीच्या महावीर ट्रेडिंग कंपनीमध्ये गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. याठिकाणी असलेल्या खाद्यतेल व त्याचे पॅकिंग मटेरियल पूर्णतः जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही आग विझविण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोठी कसरत केली. मात्र, आग विझवण्याचा प्रयत्न केला असता तेलामुळे जास्त भडकू लागली. या ठिकाणी आग विझविण्यासाठी माजलगाव नगरपालिका ,सोळंके साखर कारखाना , गेवराई नगरपालिका आदी ठिकाणाहून अग्निशामन दल येऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. या आगीत मोठी हानी झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.