सोयाबीनच्या गंजीला आग; अडीच लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:54+5:302021-09-26T04:36:54+5:30
केज : तालुक्यातील पिसेगाव येथील शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला शनिवारी सकाळी आग लागल्याने सोयाबीनची गंज खाक झाली. ...
केज : तालुक्यातील पिसेगाव येथील शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला शनिवारी सकाळी आग लागल्याने सोयाबीनची गंज खाक झाली. यात शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
केज तालुक्यातील पिसेगाव येथील शेतकरी लिंबराज पांडुरंग सूर्यवंशी यांनी गावाच्या पूर्वेकडील भागात असलेली तीन एकरमधील सोयाबीन काढून गंज लावून ठेवली होती. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान या गंजीस आग लागल्याने गंज जाळून खाक झाली. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
250921\img-20210925-wa0028.jpg
पिसेगाव येथील शेतकऱ्याने तीन एकर मधील सोयाबीन काढून शेतात गंज लावली होती या गांजीस शनिवारी अचानक आग लागल्याने संपूर्ण गंज आगीत भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे