आधी रिचवली दारू, नंतर पेट्रोल टाकून पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:54+5:302021-09-25T04:36:54+5:30

दिंद्रूड : वाढदिवस साजरा करण्याचा बहाणा करून युवकाला घराबाहेर बोलावून जीपमध्ये घालून धारुर घाटात पेट्रोल ओतून पेटविल्याची थरारक घटना ...

First alcohol was poured, then petrol was thrown and lit. | आधी रिचवली दारू, नंतर पेट्रोल टाकून पेटविले

आधी रिचवली दारू, नंतर पेट्रोल टाकून पेटविले

Next

दिंद्रूड : वाढदिवस साजरा करण्याचा बहाणा करून युवकाला घराबाहेर बोलावून जीपमध्ये घालून धारुर घाटात पेट्रोल ओतून पेटविल्याची थरारक घटना २१ सप्टेेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती. यातील जखमीची मृत्यूशी झुंज सुरू असून मुख्य आरोपीला २३ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा बेड्या ठोकण्यात दिंद्रूड पोलिसांना यश आले. दरम्यान, या प्रकरणाचे गूढ अद्याप उलगडलेले नसून दारूच्या तर्र नशेत त्यांनी त्यास पेटविल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे.

माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथील कृष्णा अर्जुन गायकवाड (वय १९) यास आदिनाथ सुधाकर गायकवाड (रा. मंगरुळ पीर क्र. २ ) याने भ्रमणध्वनी करून वाढदिवस साजरा करायचा आहे, असे सांगून गावाबाहेर बोलावले, नंतर एका पांढऱ्या गाडीमध्ये बसवले. आदिनाथसह अन्य तीन अनोळखी तरुणांनी कृष्णा यास मारहाण करत पोत्यात टाकून थेट सोनीमोहा ते धारूर रस्त्यावरील घाटात आणून त्याला खाली उतरवत लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. दरम्यान, यापूर्वी त्यांनी घटनास्थळी यथेच्छ दारू रिचवली होती. तर्रर्र नशेत त्यांनी हे कृत्य केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे. जखमी कृष्णा याने कशीबशी आग विझवून जवळच्या वस्तीवरील लोकांच्या मदतीने नातेवाइकांना संपर्क केला. या घटनेत त्याचा चेहरा संपूर्णपणे भाजला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक आरोपी अटकेत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमागचे नेमके कारण अजून समोर आले नाही, असे सहायक निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी सांगितले.

...

माजलगावात आवळल्या मुसक्या

जखमी कृष्णाचे चुलते भीमराव गायकवाड यांच्या तक्रारीवरून आदिनाथ गायकवाडसह अनोळखी तीनजणांवर दिंद्रूड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार आदिनाथ २३ सप्टेंबर रोजी माजलगावजवळील एका घरात दबा धरून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यास २४ सप्टेंबर रोजी माजलगाव न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी दिली.

240921\img-20210924-wa0064.jpg

अपहरण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दिंद्रुड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पाच दिवसांची पोलीस कोठडी

Web Title: First alcohol was poured, then petrol was thrown and lit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.