जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:29+5:302021-04-08T04:33:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ८ एप्रिल २०२०. हा दिवस सर्वांच्याच लक्षात आहे. बीड जिल्ह्यात याच दिवशी पहिल्या कोरोनाबाधित ...

In the first corona-free thaw in the district | जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित ठणठणीत

जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित ठणठणीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : ८ एप्रिल २०२०. हा दिवस सर्वांच्याच लक्षात आहे. बीड जिल्ह्यात याच दिवशी पहिल्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि प्रशासन व आरोग्य विभागासह बीडकरांची झोप उडाली. आज याला वर्षपूर्ती होत आहे. तेव्हापासून आजही कोरोना जिल्ह्यात कायम असून नागरिकांच्या मनात भितीयूक्त वातावरण आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट १०.१९ टक्के असून डेथ रेट २.३४ टक्के आहे. रिकव्हरी रेट ८८.५३ टक्के आहे.

२०२० हे वर्ष कोरोनामुळे सर्वांसाठीच त्रासदायक राहिले. राज्यात सर्वत्र कोरोनाबाधित रुग्ण आढळत असताना बीड प्रशासनाने कोरोनाला जिल्ह्यात प्रवेश दिला नव्हता. ८ एप्रिल २०२० रोजी आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एक व्यक्ती छुप्या मार्गाने अ.नगरहून जिल्ह्यात आला. त्याला शोधून चाचणी केली असा तो बाधित आढळला. तो जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने त्याची नाेंद बीडमध्ये झाली होती. त्याने १४ दिवस अहमदनगरच्या रुग्णालयात उपचार घेतले. दोन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तो बीड जिल्ह्यात आला होता.

दरम्यान, गतवर्षी कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आजही तो पाय पसरताना दिसत आहे. जिल्ह्यात रोज ५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.

इंजेक्शन, गोळ्यांचा तुटवडा

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडीसिवीर आणि फॅबीफ्लू गोळ्या जास्त प्रमाणात दिल्या जातात. सध्या याचा जिल्ह्यात मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल होत असल्याचे दिसत आहे.

खाजगी कोवीड केअर सेंटर्सला परवानगी

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये आणि कोवीड केअर सेंटर्समध्ये सध्या खाटांची संख्या कमी पडत आहे.

त्यामुळे आता खाजगी रुग्णालयांना परवानगी देण्यावर अधिक भर दिला जात आहे.

पहिला पॉझिटिव्ह सध्या काय करतोय

आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील ६२ वर्षिय कोरोनाबाधित रुग्ण सध्या ठणठणीत आहे. त्यांच्या घरी किराणा दुकान असल्याचे सांगण्यात आले.

या बाधिताची केवळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याने इकडे नोंद झाली होती. चाचणी व उपचार नगरमध्ये झाले होते.

पहिला रुग्ण आढळताच आरोग्य विभाग व प्रशासन पंधरा दिवस पिंपळा गाव परिसरात तळ ठोकून होते.

Web Title: In the first corona-free thaw in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.