‘कुंडलिका’च्या डाव्या व उजव्या कालव्यांतून पाण्याचे उन्हाळी पहिले आवर्तन सुरू; शेतकरी समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:04+5:302021-03-20T04:32:04+5:30

धारूर : उपळी कुंडलिका प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गुरुवारी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. यामुळे पिकाला जीवदान मिळाले ...

The first cycle of summer water starts from the left and right canals of ‘Kundalika’; Farmers satisfied | ‘कुंडलिका’च्या डाव्या व उजव्या कालव्यांतून पाण्याचे उन्हाळी पहिले आवर्तन सुरू; शेतकरी समाधानी

‘कुंडलिका’च्या डाव्या व उजव्या कालव्यांतून पाण्याचे उन्हाळी पहिले आवर्तन सुरू; शेतकरी समाधानी

Next

धारूर : उपळी कुंडलिका प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गुरुवारी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. यामुळे पिकाला जीवदान मिळाले आहे. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील संपूर्ण तलाव धरण पाण्याने शंभर टक्के पूर्ण भरलेले आहेत.

सध्या रब्बीच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे पाटबंधारे विभाग तेलगाव यांच्याकडे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. सध्या रब्बीचे पीक जोमात असून, पाण्यामुळे पिके कोमेजून जाऊ लागली होती. यासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे आणि शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्यामुळे पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी गुळभिले तसेच मोजणीदार डी. डी. सावंत यांनी तत्काळ शेतकरी वर्गाकडून पाणी अर्ज भरून घेऊन पाणीपट्टी भरून घेतली आणि शेती भिजविण्यासाठी पाटाला पाणी सोडण्यात आले. याचा फायदा तलावाखालील गावे, पुसरा, हिवरगव्हाण, उपळी, आदी गावांना होणार आहे. तसेच हे पाणी नवीन ऊस लागवड, तुटून गेलेला ऊस, भुईमूग यांना जीवनदायी ठरणार आहे, असे मोजणीदार डी. डी. सावंत यांनी सांगितले. पाणी सोडण्यासाठी परिसरातील शेतकरी तयब पटेल, बालासाहेब मोरे, अनुरथ मोरे, सचिन हरकाळ, सतीश राऊत, विजय चव्हाण, आदी हजर होते.

उत्पादन वाढण्यास मदत होणार - राहूल राठोड

माझे दोन एकर भुईमूग पिक सध्या बहारात आले होते. मला पाण्याची खूप आवश्यकता होती. पाटाला पाणी आल्यामुळे मी समाधानी झालो आहे, असे शेतकरी राहूल राठोड यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज करावेत - अभियंता डि बी गुळभिले

शेतकरी वर्गाची मागणी येताच पाणी अर्ज भरून घेऊन सध्या पिकाला पाणी देणे गरजेचे आहे आणि तलाव शंभर टक्के भरल्या मूळे पाणी सोडण्यास अडचण नाही, असे कुंडलिका तलावाचे अभियंता डि बी गुळभिले यांनी सांगितले.

===Photopath===

180321\0639img-20210318-wa0160_14.jpg

===Caption===

कुंडलिकाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाण्याचे उन्हाळी पहिले आवर्तन सुरू

Web Title: The first cycle of summer water starts from the left and right canals of ‘Kundalika’; Farmers satisfied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.