पहिल्या दिवशी ५ विद्यार्थी रस्टिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:20 AM2019-03-02T00:20:08+5:302019-03-02T00:20:49+5:30

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी भरारी पथकाने ५ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई केली.

On the first day, 5 student racetracks | पहिल्या दिवशी ५ विद्यार्थी रस्टिकेट

पहिल्या दिवशी ५ विद्यार्थी रस्टिकेट

Next

बीड : महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी भरारी पथकाने ५ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई केली.
शुक्रवारी प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दूचा पेपर होता. आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील पद्मावती विद्यालय परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड यांच्या पथकाने कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई केली.
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा परिषद मा. विद्यालय व लिंबारुई येथील नवीन विद्यालय परीक्षा केंद्रावर प्रत्येकी एक अशा दोन विद्यार्थ्यांवर शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांच्या पथकाने कारवाई केली.
तर परळी तालुक्यातील टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रावर डायटचे प्राचार्य विनोद देवगावकर यांच्या पथकाने एका विद्यार्थ्यावर कारवाई केली.
जिल्हयातील १५२ केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. १५ परिरक्षक केंद्र आहेत.
४३ हजार ७८७ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.

Web Title: On the first day, 5 student racetracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.