पारनेर येथे उपकेंद्रात मोफत लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:35+5:302021-04-13T04:31:35+5:30
पाटोदा : तालुक्यातील पारनेर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी राधकिसन पवार व संजय नवले पाटील यांच्या नियोजनातून घेतलेल्या ...
पाटोदा : तालुक्यातील पारनेर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी राधकिसन पवार व संजय नवले पाटील यांच्या नियोजनातून घेतलेल्या लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पारनेर व परिसरातील ४५ वर्ष वयोगटाच्या पुढील लोकांना मोफत लस देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शोभाताई संजय नवले पाटील, वाहली आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. भोंडवे उपस्थित होत्या. लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. यावेळी २२० जणांना लस देण्यात आली. पारनेर, शिखरवाडी, कुटेवाडी, नागेशवाडी गवळवाडी, पानेवाडी, येवलवाडी येथील ग्रामस्थांना मोफत कोरोना लस देण्यात आली. पारनेर येथील पारेश्वर विद्यालयात हे लसीकरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अभय पवार व सर्व शिक्षक, ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सर्व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. या माेहिमेसाठी सीएचओ अस्मिता बाबजी, सीएचओ रूपाली कुमरे, सिस्टर शेवाळे, काळे, एम. पी. डब्ल्यू. सानप, टेक्निशियन खाडे आणि उपकेंद्र, पारनेरच्या सर्व आशा सेविकांनी योगदान दिले.
पारनेर येथील उपकेंद्रात मोफत लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला.
===Photopath===
120421\12bed_1_12042021_14.jpg