राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘झाडवाली झुंबी’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:41 AM2018-01-23T00:41:53+5:302018-01-23T00:41:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या १५ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत ७ ते १२ ...

First 'Shrimp Dhanvali' in State Ballet Championship | राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘झाडवाली झुंबी’ प्रथम

राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘झाडवाली झुंबी’ प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्देइचलकरंजीत होणा-या अंतिम स्पर्धेत लागणार कस

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या १५ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत ७ ते १२ जानेवारी दरम्यान औरंगाबाद, नांदेड आणि बीड या केंद्रात झालेल्या तब्बल ६३ नाटकांमधून डॉ. सतीश साळुंके लिखित ‘झाडवाली झुम्बी’ या नाटकाने सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवित अंतिम फेरीत धडक मारली.

परिवर्तन संस्थेने या स्पर्धेत ‘झाडवाली झुम्बी’ व ‘काऊ-मौऊ’ ही बालनाटके सादर केली होती. त्यापैकी ‘झाडवाली झुम्बी’ प्रथम आले. या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी अशोक घोलप यांना प्रथम पारितोषिक मिळाले तर झुंबीच्या भूमिकेसाठी श्रद्धा रामराव निर्मळ हिला मुलींमध्ये अभिनयाचे प्रथम बक्षीस रौप्यपदक मिळाले. तसेच ‘काऊ-मौऊ’ नाटकाच्या नेपथ्यासाठी मंगेश रोटे यांना प्रथम पारितोषिक मिळाले.

या नाटकाच्या प्रकाश योजनेसाठी आकांक्षा सतीश श्रीखंडे यांना प्रथम बक्षीस मिळाले. या नाटकात काऊ कावळ्याची अप्रतिम भूमिका करणाºया ओंकार पुरुषोत्तम धारूरकर यास मुलांमध्ये अभिनयाचे प्रथम बक्षीस रौप्यपदक मिळाले. इचलकरंजी येथे १२ फेब्रुवारी पासून सुरु होणाºया अंतिम फेरीत ‘झाडवाली झुम्बी’ सादर होईल. नाटकासाठी प्रा. सुधा सतीश साळुंके, प्रा. तन्मय शेटगार, संदीप पवार, संतोष पवार, प्रशांत मुळे, बापू भोसले, प्रदीप मनोहर यांचे सहकार्य लाभले. संस्कारचे कार्यवाह कालीदासराव थिगळे, नामदेवराव क्षीरसागर, मुख्याध्यापिका प्रतिभा सुभेदार व सुधीर निमगावकर यांच्यासह कलाप्रेमींनी स्वागत केले आहे.

परिवर्तनचा पुरस्कारांचा विक्रम
सर्वोत्कृष्ट नाटकासह दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य, अभिनय मुले व मुली दोन्ही विभागातील रौप्यपदके अशी सहा प्रथम पुरस्कार पटकावत सतत चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याचा विक्रम बीडच्या परिवर्तनने संस्थेने केला आहे.

Web Title: First 'Shrimp Dhanvali' in State Ballet Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.